Japanese Grand Prix 2026: फॉर्म्युला 1 च्या 2026 हंगामातील तिसरी शर्यत जपानच्या ऐतिहासिक सुझुका सर्किट (Suzuka Circuit) वर रविवारी, 29 मार्च 2026 रोजी पार पडली. मर्सिडीजचा 19 वर्षीय इटालियन रेसर किमी अँटोनेली (Kimi Antonelli) यानं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह तो फॉर्म्युला 1 च्या इतिहासात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत (Championship Standings) आघाडी घेणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तसेच त्यानं झालेल्या या चुरशीच्या शर्यतीत मर्सिडीजच्या किमी अँटोनेलीनं आपल्या कारकिर्दीतील सलग दुसरं विजेतेपद पटकावून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कसा मिळाला विजय?
अँटोनेलीनं शर्यतीची सुरुवात पोल पोझिशनवरून (Pole Position) केली होती, मात्र सुरुवातीला खराब स्टार्टमुळे तो सहाव्या स्थानावर फेकला गेला. शर्यतीच्या मध्यंतरात ऑलिव्हर बेअरमनच्या अपघातामुळे सेफ्टी कार (Safety Car) तैनात करण्यात आली, ज्याचा अँटोनेलीला मोठा फायदा झाला. त्यानं योग्य वेळी टायर बदलण्यासाठी पिट-स्टॉप (Pit-stop) घेतला आणि पुन्हा आघाडी मिळवली. शेवटच्या लॅप्समध्ये त्यानं आपलं वर्चस्व कायम राखत मॅकलारेनच्या ऑस्कर पियास्ट्रीवर 13.7 सेकंदांची मोठी आघाडी घेत विजय निश्चित केला.
या स्पर्धेत दुसरं स्थान मॅकलारेनचा ऑस्कर पियास्ट्री (Oscar Piastri) यानं मिळवलं. फेरारीचा चार्ल्स लेक्लर्क (Charles Leclerc), ज्यानं जॉर्ज रसेलला मागं टाकून तिसरं स्थान पटकावलं.
अँटोनेलीची मागील कामगिरी
अँटोनेलीनं काही दिवसांपूर्वी चीन ग्रांप्री (Chinese GP) मध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिलं विजय मिळवलं होतं. तो मर्सिडीज (Mercedes-AMG Petronas F1 Team) कडून रेसिंग करतो. तो फक्त 19 वर्षे आणि 21 दिवस वय असलेला हा तरुण खेळाडू सलग दोन शर्यती जिंकणारा पहिला किशोरवयीन रेसर ठरला आहे.
जिंकल्यानंतर अँटोनेली म्हणाला की, “मर्सिडीजच्या इंजिनिअर्सनी पिट-स्टॉप दरम्यान घेतलेला निर्णय आणि सेफ्टी कारची वेळ आमच्या पथ्यावर पडली. ही गाडी चालवताना मला खूप आत्मविश्वास मिळत होता”.
Max Verstappen आणि इतर निकाल
चारवेळा विश्वविजेता राहिलेल्या मॅक्स व्हर्स्टाप्पेनला (Max Verstappen) या शर्यतीत संघर्ष करावा लागला आणि तो आठव्या स्थानावर राहिला. अँटोनेलीचा संघसहकारी जॉर्ज रसेल चौथ्या स्थानावर, तर सात वेळा विश्वविजेता लुईस हॅमिल्टन सहाव्या स्थानावर राहिला.

