ऋतुराजने लिस्ट ‘ए’ मध्ये मागिल ५ डावांत ३ शतक आणि १ अर्धशतक लावूनही सिलेक्टर्स करतात नजअंदाज

Ruturaj Gaikwad: सध्या ऋतुराज गायकवाड भारतीय ‘अ’ संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. जिथे भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान अ यांच्यात त्रिपक्षीय एकदिवसीय मालिका चालू आहे. या मालिकेचा पहिला सामना दांबुलामध्ये खेळवला गेला. या सामन्यात सुरूवातीलाच भारतीय संघाने आपले दोन्ही सलामीवीर गमवावे लागले होते. पण त्यानंतर ऋतुराज मैदानावर आला. त्याने फक्त डावालाच सांभाळलं नाही तर ११४ चेंडूत ८८.५९ च्या स्ट्राईक रेटनं १०१ धावांची शतकी खेळी केली. यात त्यानं ६ चौकार आणि ३ षटकार लावले. या शतकी खेळीसोबत त्यानं लिस्ट ‘ए’ मध्ये २१ वे शतक मारले आहे तर लिस्ट ‘ए’ च्या मागिल ५ सामन्यात ऋतुराजनं ३ शतक आणि १ अर्धशकत मारले आहे तरीही त्याला भारतीय सिलेक्टर्स नजरअंदाज करतात असं अनेक चाहत्यांचं म्हणण आहे.

ऋतुराज गायकवाडची लिस्ट ‘ए’ मधील मागिल ५ सामन्यांची कामगिरी
गायकवाडच्या जबरदस्त कामगिरीचा अंदाज यावरूनच लावू शकतो की, त्यानं लिस्ट ‘ए’ मध्ये मागिल ५ सामन्यांत ४४७ धावा केल्या आहेत. याच दरम्यान तो एकवेळी १३४ धावा करून नाबाद सुद्धा राहिला आहे. गायकवाडची लिस्ट ए च्या मागिल ५ डावातील कामगिरी १२४, ६६, २२, १३४ आणि १०१ असे आहेत.

ऋतुराज गायकवाडचं लिस्ट ‘ए ‘मधील आतापर्यंतची कामगिरी
ऋतुराजनं लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये आतापर्यंत १०० सामने खेळले आहेत. त्यानं ९६ डावात ५९.३२ च्या सरासरीनं ५१६१ धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं २१ शतक आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २२० धावांचं नाबाद दुहेरी शतक हे त्याचं सर्वोच्च शतकीय डाव आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.