युकी भांब्री-मायकल व्हीनस आज खेळणार सेमीफायनल

म्युनिच (जर्मनी): भारताचा अव्वल दुहेरी खेळाडू युकी भांब्री (yuki bhambri) आणि न्यूझीलंडचा मायकल व्हीनस (michael venus) या जोडीनं जर्मनीतील म्युनिच येथे सुरू असलेल्या ‘बीएमडब्ल्यू ओपन 2026’ मध्ये आपले वर्चस्व कायम राखलं आहे. गुरुवारी, 16 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या सामन्यात या जोडीनं ल्युसियानो डार्डेरी (Luciano Darderi) आणि सँटियागो गोन्झालेझ (Santiago González) या जोडीचा 6-4, 6-1 अशा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. आणि या विजयानं या जोडीनं उपांत्य फेरीत (semifinal) धडक मारली आहे.

क्ले कोर्टवर रंगलेला हा सामना फक्त 1 तास 6 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धींनी चांगली टक्कर दिली, पण भांब्री-व्हीनस जोडीनं मोक्याच्या क्षणी डार्डेरी-गोन्झालेझची सर्व्हिस ब्रेक करत 6-4 ने सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र भारतीय-कीवी जोडीनं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची कोणतीही संधी न देता अवघ्या एका गेमवर रोखले आणि 6-1 ने विजय मिळवून उपांत्य फेरीत मजल मारली.

बीएमडब्ल्यू ओपन (म्युनिच मास्टर्स) ही एटीपी 250 दर्जाची प्रतिष्ठित स्पर्धा आहे. युकी भांब्री या स्पर्धेचा गतविजेता राहिला आहे. आणि आता सुद्धा तो मागिल वर्षाची पुनरावृत्ती करण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी त्यांनी पहिल्या फेरीत अव्वल मानांकित केविन क्रॅविट्झ आणि टिम पुट्झ या जोडीला पराभूत करून मोठा उलटफेर केला होता.

युकी भांब्री आणि मायकल व्हीनस यांचा उपांत्य फेरीचा सामना आज, शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी खेळवला जाणार आहे. हा त्यांचा सामना जर्मनीच्या स्थानिक जोडी जेकोब श्नाइटर (Jakob Schnaitter) आणि मार्क वॉलनेर (Mark Wallner) यांच्याशी होईल. भारतीय चाहत्यांना आशा आहे की, तो नक्कीच हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपली जागा पक्की करेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.