मायामी ओपन 2026; सबालेन्काची अंतिम फेरीत धडक

Miami Open 2026: नुकत्याच झालेल्या (गुरुवार 26 मार्च) मायामी ओपन 2026 च्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिनं (Semi-finals) आपली कट्टर प्रतिस्पर्धी आणि जागतिक नंबर 2 च्या एलेना रायबाकिना (Elena Rybakina) हिचा पराभव केला आहे. आणि अंतिम फेरीत (Finals) धडक मारली आहे. या विजयासह सबालेन्का आता ‘सनशाईन डबल’ (इंडियन वेल्स आणि मायामी दोन्ही जिंकणे) पूर्ण करण्यापासून फक्त एक पाऊल लांब आहे. तसेच तिनं (Aryna Sabalenka) सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कसा मिळवला विजय?

पहिल्या सेटमध्ये सबालेन्कानं रायबाकिनाची सर्व्हिस दोनदा ब्रेक करत 6-4 अशी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये रायबाकिनानं सुरुवातीला 40-0 अशी आघाडी घेतली होती, पण सबालेन्काने जोरदार पुनरागमन करत तिचा प्रतिकार मोडीत काढला आणि 6-3 असा विजय मिळवला. 1 तास 19 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 6-4, 6-3 असे गुण मिळवले आणि हा सामना जिंकला. सबालेन्काचा रायबाकिनावरील हा 10 वा विजय ठरला आहे.

पुढचा सामना- फायनल

अंतिम फेरीत सबालेन्काचा सामना अमेरिकेची युवा स्टार आणि चौथी मानांकित कोको गॉफ (Coco Gauff) हिच्याशी होईल. हा विजेतेपदाचा सामना शनिवारी (28 मार्च 2026) खेळवला जाईल.

मागील कामगिरी

सबालेन्का सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तिनं नुकत्याच झालेल्या इंडियन वेल्स (indian wells) च्या अंतिम फेरीत रायबाकिनाचाच पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं. या वर्षी (2026) तिनं आतापर्यंत 21-1 असा जबरदस्त रेकॉर्ड राखला असून तिने इंडियन वेल्स हे विजेतेपदं आधीच जिंकलं आहे. आणि जर तिनं कोको गॉफला पराभूत केलं, तर ती एकाच वर्षात इंडियन वेल्स आणि मायामी जिंकणारी जगातील पाचवी महिला खेळाडू ठरेल (‘सनशाईन डबल’)

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.