जॅनिक सिनरची सेमीफायनलला एन्ट्री

Miami Open 2026: इटलीचा स्टार टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरनं (Janik Sinner) मियामी ओपन 2026 मध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. गुरुवारी (26 मार्च) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफो (Frances Tiafoe) याला पराभूत करून उपांत्य फेरीत (semi final) प्रवेश केला आहे. या विजयामुळे अजूनही त्यानं ‘सनसाईन डबल’ जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

कसा मिळवला विजय?

सिनरने सामन्याच्या सुरुवातीलाच टियाफोची सर्व्हिस ब्रेक करून त्याच्यावर दबाव निर्माण केला. त्यानं सामन्यात एकूण 14 एसीस (Aces) लगावले आणि टियाफोला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. त्याना हा सामना 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये अवघ्या 71 मिनिटांत त्याचा (फ्रान्सेस) पराभव केला.

सामन्यानंतर बोलताना सिनर म्हणाला, “मला असं वाटतं की सामन्याची सुरुवात चांगली करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आघाडी घेऊन सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला आधीच थोडा चांगला आत्मविश्वासही मिळतो,” असं सिनर म्हणाला.

उपांत्य फेरी (Semi-final)

सिनरचा पुढचा उपांत्य फेरीचा सामना शनिवारी (28 मार्च 2026) खेळवला जाणार आहे. त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) याच्याशी होईल.

सिनरची मागील कामगिरी

सध्या जॅनिक सिनर जागतिक क्रमवारीत 2ऱ्या (World No. 2) स्थानी आहे. या विजयामुळे त्यानं एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांमध्ये सलग 30 सेट जिंकण्याचा नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला आहे. त्यानं याच महिन्यात इंडियन वेल्स 2026 चं विजेतेपद पटकावलं आहे. त्याची मागिल कामगिरी पाहता जर त्यानं (सिनर) ही स्पर्धा जिंकली, तर तो 2017 मध्ये रॉजर फेडररनं केलेल्या ‘सनशाईन डबल’ (एकाच वर्षी इंडियन वेल्स आणि मियामी जिंकणे) विक्रमाची बरोबरी करेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.