न्यूझीलंडला नमवून भारताचे स्पर्धेत पुनरागमन!

Billie Jean King Cup: बिली जीन किंग चषक 2026 स्पर्धेत यजमान भारतीय महिला टेनिस संघानं पहिल्या सामन्यातील अपयशानंतर जबरदस्त पुनरागमन करत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीतील डीएलटीए स्टेडियमवर पार पडली आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात थायलंडकडून 1-2 असा पराभव स्विकारावा लागला होता, मात्र भारतानं दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडला एकही संधी न देता सर्वच्या सर्व तीन सामन्यांत विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे.

भारताला कसा मिळाला विजय
या विजयाची सुरुवात भारताच्या युवा खेळाडू वैष्णवी अडकरनं केली, जिनं आपल्या प्रभावी सर्व्हिस आणि चपळ हालचालींच्या जोरावर न्यूझीलंडच्या आयशी दासचा 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताची प्रमुख खेळाडू सहजा यमलापल्लीनं चांगलं प्रदर्शन दाखवत व्हॅलेंटिना इव्हानोव्हचा 6-1, 6-3 असा सहज मात दिली आणि भारताचा विजय निश्चित केला. अंतिमतः दुहेरीच्या सामन्यात अनुभवी अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले या जोडीनं एरीन रुटलिफ आणि मोनिका बॅरी यांचा 6-4, 6-2 असा पराभव करत भारताला पूर्ण 3 गुण मिळवून दिले.

गुणतालिकेत भारताची स्थिती
सध्याच्या गुणतालिकेत या विजयामुळे भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया हे संघ प्रत्येकी दोन विजयांसह पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

भारतासाठी आजचा (9 एप्रिल) इंडोनेशियाविरुद्धचा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण अव्वल दोन संघांनाच जागतिक प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळणार आहे. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि खेळाडूंचा उंचावलेला आत्मविश्वास पाहता, भारतीय संघ इंडोनेशियाला नमवून आपली आगेकूच कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.

आणखी हेही वाचा
https://agcsport.tv/tennis/indias-defeat-by-thailand/

https://agcsport.tv/badminton/aayush-shettys-explosion-sindhu-advances-while-lakshya-sen-is-out/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.