कार्लोस अल्काराझची विम्बल्डन २०२६ मधून माघार

Carlos Alcaraz: स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि दोन वेळचा विम्बल्डन विजेता कार्लोस अल्काराझनं (Carlos Alcaraz) मनगटाच्या गंभीर दुखापतीमुळे आगामी प्रतिष्ठित विम्बल्डन 2026 (Wimbledon 2026) ग्रँड स्लॅम स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे. 19 मे 2026 रोजी स्वतः अल्काराझनं सोशल मीडियाद्वारे ही निराशाजनक घोषणा केली. या ऐतिहासिक ग्रास-कोर्ट स्पर्धेची सुरुवात पुढील महिन्यात 29 जून 2026 पासून होणार असून ती 12 जुलै 2026 पर्यंत चालणार आहे.

कार्लोस कधीपासून आहे बाहेर?
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या 23 वर्षीय अल्काराझला एप्रिल 2026 मध्ये खेळवल्या गेलेल्या बार्सिलोना ओपन (Barcelona Open) स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ओटो व्हर्टाननविरुद्ध खेळताना उजव्या मनगटाला गंभीर दुखापत (Tenosynovitis) झाली होती. या दुखापतीनंतर त्यानं तातडीने बार्सिलोना ओपनमधून माघार घेतली आणि तेव्हापासून तो टेनिस कोर्टपासून पूर्णपणे लांब आहे.

मनगटाच्या या दुखापत मोठी असल्यामुळे अल्काराझला चालू हंगामातील क्ले आणि ग्रास-कोर्ट सीजनमधील महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावं लागलं आहे. बार्सिलोना ओपननंतर तो माद्रिद ओपन (Madrid Open), इटालियन ओपन (Italian Open), आणि फ्रेंच ओपन (French Open) या तीन मोठ्या क्ले-कोर्ट स्पर्धांमधून आधीच बाहेर पडला होता. आता दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला ग्रास-कोर्टवरील क्वीन क्लब चॅम्पियनशिप (Queen’s Club) आणि विम्बल्डन 2026 या आणखी दोन अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली आहे. म्हणजेच तो आतापर्यंत एकूण 5 प्रमुख स्पर्धांना मुकला आहे.

स्पर्धेतून माघार घेताना अल्काराझ म्हणाला, “माझी तब्येत आता सुधारत आहे, पण दुर्दैवाने मी अजूनही पूर्ण ताकदीनं खेळण्यासाठी सज्ज नाही. विम्बल्डन ही माझ्यासाठी अत्यंत खास स्पर्धा आहे आणि मी या वातावरणाला खूप मिस करेन. दीर्घ कारकीर्द डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत पुनरागमन करून मला दुखापत अधिक वाढवायची नाही.”

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.