MS Dhoni IPL 2026: आज (गुरूवार, 23 एप्रिल 2026) आयपीएल 2026 मध्ये दोन दिग्गज संघांचा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये पाच वेळा विजेते राहिलेले चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात हा चुरशीचा सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. त्यातच अनेक सामन्यांपासून दुखापतीमुळे बाहेर राहिलेला सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा आजचा सामना खेळू शकतो.
गेल्या काही सामन्यांपासून सीएसकेचा संघ संघर्ष करताना दिसला आहे. या हंगामात आतापर्यंत 6 सामने झाले असून त्यातले फक्त 2 सामने सीएसकेनं जिंकले आहेत. त्यामुळे २ विजयांसह आणि 4 गुणांसोबत सीएसके 8 व्या स्थानावर आहे. तर दुसरीकडं, मुंबईचे सुद्धा तेच चालू आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा 6 सामन्यांपैकी 2 जिंकले आहेत आणि 4 गुणांसह आणि नेटरन रेटसह 7 व्या स्थानावर आहेत.
गेल्या अनेक सामन्यांपासून बाहेर असलेला धोनी आजचा सामना खेळण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. कारण वानखेडे स्टेडियमवर धोनी नेट्समध्ये बराच वेळ सराव करताना दिसला आहे. पण अजूनही असं कोणतंही अधिकृत बातमी समोर आली नाही की, धोनी आजचा सामना खेळेल. पण अनेक माजी दिग्गज खेळाडू आणि सीएसकेच्या चाहत्यांना आशा आहे की, धोनी नक्की आजचा सामना खेळेल.
का बाहेर होता धोनी?
आयपीएल 2026 ची सुरूवात होण्याआधीच धोनीला पायाची दुखापत झाली. त्यामुळे सीएसकेनं अधिकृत घोषणा केली होती की, धोनी आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने खेळणार नाही. पण आता धोनी पायाच्या दुखापतीतून सावरला आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आजचा सामना खेळण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. सीएसकेचा माजी कर्णधार धोनीनं आतापर्यंत 5 आयपीएल जिंकले आहेत. त्यामुळे नेहमीच त्याचा उपस्थिती संघासाठी मोलाची ठरती.
सीएसके-मुंबई हेड टू हेड
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या आतापर्यंत 39 सामने झाले आहेत. यात मुंबईचं वर्चस्व दिसून आलं आहे. कारण त्यांनी आतापर्यंत या 39 सामन्यांपैकी 21 सामने जिंकले आहेत, तर सीएसकेने 18 सामने जिंकले आहेत.

