आगामी हॉकीच्या स्पर्धेसाठी ‘या’ ३६ खेळाडूंची झाली घोषणा

India hockey team: भारतीय पुरुष हॉकी संघ आगामी 2025-26 च्या आंतरराष्ट्रीय हंगामासाठी आता सज्ज झाला आहे. हॉकी इंडियानं सोमवारी (20 एप्रिल 2026) 36 सदस्यीय वरिष्ठ पुरुष कोअर प्रोबेबल (संभाव्य) गटाची घोषणा केली आहे. बेंगळुरू येथील ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (SAI) केंद्रात या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झाली असून, ते 9 मे 2026 पर्यंत चालणार आहे.

हे शिबिर आगामी आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय हंगामाच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचं मानलं जात आहे. यामध्ये मे-जून महिन्यात होणाऱ्या एफआयएच (FIH) प्रो लीगचा युरोपमधील टप्पा, त्यानंतर होणारा हॉकी विश्वचषक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘आशियाई क्रीडा स्पर्धा’ (Asian Games) यांचा समावेश आहे. या स्पर्धांमधील कामगिरी भारतीय संघाचं जागतिक मानांकन आणि ऑलिम्पिक पात्रतेसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे हे सगळे खेळाडू कशाप्रकारे कामगिरी करतील याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी शिबिराच्या सुरुवातीला आपलं मत मांडताना सांगितलं की, “हा काळ आमच्यासाठी रणनीती आणि शारीरिक तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी प्रो लीग आणि विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांपूर्वी खेळाडूंमध्ये ताळमेळ बसवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक खेळाडूला आपली क्षमता सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.”

हॉकी इंडियानं निवडलेल्या या 36 खेळाडूंमध्ये अनुभवी दिग्गज आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा समावेश केला आहे. संघात 5 गोलकीपर्स, 10 डिफेंडर्स, 10 मिडफिल्डर्स आणि 11 फॉरवर्ड्स अशा एकूण 36 खेळांडूना स्थान मिळालं आहे.

गोलकीपर्स (5): कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा, पवन, मोहित एच.एस. आणि प्रिन्सदीप सिंग

डिफेंडर्स (10): कर्णधार हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय, सुमित, पुवन्ना सी.बी., यशदीप सिवाच, नीलम संजीप झेस आणि अमनदीप लाक्रा

मिडफिल्डर्स (10): मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकंठ शर्मा, राजकुमार पाल, राजिंदर सिंग, मनमीत सिंग, एम. रबिचंद्र सिंग, विष्णू कांत सिंग आणि रोशन कुजूर

फॉरवर्ड्स (11): मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, अराईजित सिंग हुंदल, अंगद बीर सिंग, उत्तम सिंग, सेल्वम कार्थी, आदित्य अर्जुन लालागे आणि मनिंदर सिंग

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.