आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप: आयुष शेट्टीचा विजय; सिंधू आणि प्रणॉय बाहेर!

Badminton Asia Championships 2026: चीनमधील निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टीनं आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम राखत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) धडक मारली आहे. गुरुवारी (9 एप्रिल 2026) झालेल्या फेरी 16 च्या सामन्यात त्यानं विजय मिळवून भारताच्या पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

चीनच्या निंगबो येथे 7 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत ही प्रतिष्ठेची आशियाई स्पर्धा रंगत आहे. 20 वर्षीय आयुष शेट्टीनं या स्पर्धेत एकापाठोपाठ एक मोठे विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पहिल्या फेरीत जागतिक 7 व्या क्रमांकाच्या ली शी फेंगला नमवल्यानंतर, आयुषनं आज दुसऱ्या फेरीत (फेरी 16) चिनी तैपेईच्या जागतिक 20 व्या क्रमांकाच्या ची यू जेन (Chi Yu Jen) याचा 21-16, 21-12 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आयुषनं आपल्या उंचीचा फायदा घेत जोरदार स्मॅश मारले आणि नेटवर पूर्ण नियंत्रण राखून हा सामना अवघ्या काही वेळातच खिशात टाकला. आयुष शेट्टीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या (10 एप्रिल 2026) इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित जोनाथन क्रिस्टी (Jonatan Christie) याच्याशी होणार आहे. भारतीय चाहत्यांच्या नजरा आता आयुषच्या या ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या संधीकडं लागल्या आहेत.

एकीकडे आयुषची आगेकूच सुरू असली तरी दुसरीकडे निराशाजनक बातमीही समोर आली आहे. भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिचा ‘फेरी 16’ मध्ये चीनच्या दुसऱ्या मानांकित वांग झी यी हिनं 18-21, 8-21 असा पराभव केला. अनुभवी एच. एस. प्रणॉय याला देखील चीनच्या वेंग होंग यांग कडून 12-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

याआधी पहिल्याच फेरीत भारताचे मुख्य खेळाडू लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांनाही पराभवाचा धक्का बसला होता. लक्ष्य सेनला हाँगकाँगच्या ली चेक यू कडून, तर श्रीकांतला सिंगापूरच्या लोह कीन येवकडून हार मानावी लागली होती. तसेच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीलाही दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला आहे

आणखी हेही वाचा
न्यूझीलंडला नमवून भारताचे स्पर्धेत पुनरागमन!
https://agcsport.tv/tennis/india-returns-to-the-tournament-by-defeating-new-zealand/

रग्बीचा दुसऱ्या हंगामाची जूनमध्ये होणार सुरूवात- https://agcsport.tv/other/the-second-season-of-rugby-will-begin-in-june/





Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.