RCB vs GT IPL 2026: काल (30 एप्रिल) झालेल्या सामन्यात मोठा वादाचा विषय झाला. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यात जेसन होल्डर यानं घेतलेल्या झेलमुळे वाद निर्माण झाला आहे. रजत पाटीदारच्या झेल घेताना चेंडू जमिनीला लागताना दिसला, पण तिसऱ्या पंचानी झेल नियंत्रणात आहे असं मानलं आणि रजतला बाद (out) देण्यात आलं. या झेलमुळे विराट कोहली सुद्धा पंचाच्या या निर्णयावर नाराज असतानी दिसला.
ही घटना घडली आरसीबीच्या फलंदाजीच्या पहिल्या डावात झाली. 8 व्या षटकात गुजरातचा वेगवान गोलंदाज अरशद खान आला. त्यावेळी त्यानं शॉट बॉल टाकला आणि त्यालाच मारताना रजत पाटीदारचा झेल उडाला. त्या झेलला जेसन होल्डरनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून तो झेल पकडला.
It’s heating up in Ahmedabad! 🔥#JasonHolder caught #RajatPatidar at the boundary, but the #RCB camp wasn’t convinced with the decision! 👀#TATAIPL 2026 ➡️ #GTvRCB | LIVE NOW 👉https://t.co/K8vuSzrZ1d pic.twitter.com/GwfAoIelDj
— Star Sports (@StarSportsIndia) April 30, 2026
पहिल्या वेळेस अनेकांना वाटला हा झेल सुटला आहे, कारण चेंडू जमीनीला टेकताना दिसला. पाटीदार पनेलियन गेला सुद्धा होता, दरम्यान तिसऱ्या पंचाचा निर्णय अद्याप बाकी होता. ज्यावेळी रिप्ले करताना पाहिलं त्यावेळी चेंडू जमीनीला लागला आहे असं दिसलं, पण होल्डरचा झेल नियंत्रणात दिसला.
तिसऱ्या पंचानी हा झेल बरोबर मानून रजत पाटीदारला बाद करार दिलं. पण हा निर्णय RCB च्या कोणत्याही खेळाडूंना आणि चाहत्यांना पटला नाही. विराट कोहली सुद्धा खूप नाराज असलेला दिसला. तसेच बाहेर असलेल्या एका पंचासोबत या झेलविषयी बोलतानाही दिसला.
MCC चा काय नियम आहे?
मेरिलबॉर्न क्रिकेट क्लब (MCC) च्या नियमानुसार 33.2.2.1 च्या नुसार, जर चेंडू क्षेत्ररक्षाच्या हातात नियंत्रणात असेल तर, तो चेंडू भलेही जमीनीला जरी लागला तरी झेल बरोबर मानला जाईल.
या सामन्यात सुद्धा असंच काही पाहायला मिळालं. चेंडूचा संपर्क जमीनीला झाला, पण होल्डरचं त्या झेलवर नियंत्रण पुर्णपणे होतं त्यामुळे पंचांनी नियमाचं पालन करताना हा झेल बरोबर मानला.
आणखी हेही वाचा
जॅनिक सिनर ‘असं’ करणारा ठरला सहावा खेळाडू!-https://agcsport.tv/tennis/janik-sinner-became-the-sixth-player-to-do-so/

