सुनील छेत्री (Sunil Chhetri)

    0
    10
    Sunil Chhetri is one of the greatest players in the history of Indian football. He is the fourth highest goal scorer in international football.
    sunil chhetri biography

    “भारतीय फुटबॉलचा Goal Machine आणि अभिमान!”

    भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंमध्ये सुनिल छेत्री यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. उत्कृष्ट गोलस्कोअरिंग क्षमता, नेतृत्व आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांनी भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळवून दिली. अनेक वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व करत त्यांनी देशातील फुटबॉलप्रेमींना अनेक ऐतिहासिक क्षण दिले. तसेच १५१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९४ गोल केले आहेत.

    सुरूवातीचं जीवन

    सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1984 रोजी सिकंदराबाद येथे झाला. त्यांचे वडील सैन्यात होते आणि आई देखील फुटबॉल खेळाडू होत्या. परिणामी, त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची गोडी लागली. शालेय स्तरावर त्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर, त्यांनी व्यावसायिक स्तरावर खेळण्यास सुरुवात केली.

    आंतरराष्ट्रीय पदार्पण
    Sunil Chhetri यांनी २००५ साली भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी गोल केला. ही त्यांच्या शानदार कारकिर्दीची सुरुवात होती.

    कारकिर्द आणि विक्रम

    • सुनील छेत्री हे भारताचे सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटू आहेत.
    • आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 90 पेक्षा जास्त गोल करणारे भारतीय खेळाडू.
    • जगातील सर्वाधिक सक्रिय गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते.
    • SAFF चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला अनेक वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका.
    • क्लब फुटबॉलमध्ये त्यांनी बंगळुरू FC आणि इतर क्लबकडूनही शानदार कामगिरी केली.

    नेतृत्व आणि शैली

    सुनील छेत्री हे भारतीय फुटबॉल संघाचे दीर्घकाळ कर्णधार राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. आणि अनेक स्पर्धा जिंकल्या सुद्धा आहेत. त्यांची खेळण्याची शैली वेगवान, आक्रमक आणि गोल करण्यावर केंद्रित आहे. मैदानावर त्यांची ऊर्जा आणि संघासाठी लढण्याची वृत्ती इतर खेळाडूंनाही प्रेरणा देते.

    पुरस्कार आणि सन्मान

     

    सुनील छेत्री यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.

    • 2011 मध्ये त्यांना अर्जुन अवार्ड मिळाला.
    • 2019मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
    • मेजर ध्यानचंद खेल रत्न अवार्ड 2021 मध्ये मिळाला.
    • AIFF कडून अनेक वेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

    सुनिल छेत्री यांचा आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि शेवटचा सामना
    पदार्पण– भारत विरूद्ध पाकिस्तान, पाकिस्तान- जून 12, 2005
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध कुवेत, कोलकत्ता- जून 6, 2024

    निष्कर्ष: 
    सुनील छेत्री हे भारतीय फुटबॉलचे सर्वात मोठे प्रतीक मानले जातात. आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या जगात सुनिल छेत्री चौथ्या स्थानावर आहेत. तसेच त्यांच्या गोलस्कोअरिंग क्षमता, नेतृत्व आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांनी भारतीय फुटबॉलला नवी उंची दिली. त्यामुळे भारताच्या क्रीडा इतिहासात त्यांचे नाव नेहमीच अभिमानाने घेतले जाईल.

    Player Biography
    Full Nameसुनिल छेत्री
    SportFootball
    CountryIndia
    Gendermale
    Playing Role
    Date of Birth
    Total Matches
    Highest Score
    Total Career Score
    Latest Match
    Awards
    Previous articleवंदना कटारिया
    Next articleचुनी गोस्वामी
    Akash_Sonawane
    AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.