India vs Jamaica: भारतीय पुरुष फुटबॉल संघ (ब्लू टायगर्स) तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर युनायटेड किंगडमच्या (UK) भूमीवर परतला आहे. आज 27 मे 2026 रोजी एका ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. लंडन येथील प्रसिद्ध ‘द व्हॅली’ (The Valley) स्टेडियमवर चार देशांचा समावेश असलेल्या ‘युनिटी कप 2026’ (Unity Cup 2026) या आंतरराष्ट्रीय फ्रेंडली स्पर्धेत भारताचा सामना जॅमाइका (Jamaica) संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:00 वाजता, 28 मे खेळवला जाईल.
हा सामना एक सामान्य मैत्रीपूर्ण सामना नसून तो या चार देशांच्या बाद फेरीच्या (Knock-out) स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा (Semi-Final) सामना आहे. या स्पर्धेत भारत आणि जॅमाइकाशिवाय नायजेरिया आणि झिम्बाब्वे हे संघ सहभागी झाले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट 30 मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत (Final) धडक मारेल. जागतिक क्रमवारीत 71 व्या स्थानावर असलेल्या जॅमाइकासमोर 136 व्या स्थानावर असलेला भारतीय संघ अंडरडॉग म्हणून मैदानात उतरणार असला, तरी भारतीय खेळाडू मोठा उलटफेर करण्यास उत्सुक आहेत.
नवी रणनीती आणि भारतीय संघ
भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक खालिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवा संघ एका नव्या रणनीतीसह मैदानात उतरत आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या कर्णधारपदाची धुरा अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर उपकर्णधार म्हणून गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याची निवड केली आहे.
भारतीय फुटबॉल संघ
गोलरक्षक– गुरप्रीत सिंग संधू, ऋतिक तिवारी, अल्बिनो गोम्स.
बचावपटू (Defenders): राहुल भेके, संदेश झिंगन, आकाश मिश्रा, निखिल पुजारी, रोशन सिंग, बिजॉय वर्गीस, निखिल बार्ला.
मध्यांतर खेळाडू (Midfielders): जेकसन सिंग, नौफल पीएन, रिकी शबोंग, मॅकार्टन निक्सन.
आक्रमक (Forwards): लालियानझुआला छांगटे, रायन विल्यम्स, एडमंड लालरिंदिका, रहिम अली, फारुख चौधरी, विक्रम प्रताप सिंग.

