२२ वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ संपला; ईस्ट बंगाल बनला पहिल्यांदाच आयएसएल चॅम्पियन

ISL 2026: भारतीय फुटबॉलच्या इतिहासात 21 मे 2026 ची रात्र सुवर्णअक्षरांनी लिहिली गेली आहे. कोलकत्ता येथील किशोर भारती क्रीडांगण मैदानावर पार पडलेल्या इंडियन सुपर लीग (ISL 2025-26) च्या थरारक अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल एफसी (East Bengal FC) संघानं इंटर काशी (Inter Kashi) संघाचा 2-1 असा पराभव करून पहिल्यांदाच ऐतिहासिक आयएसएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरले. या ऐतिहासिक विजयामुळे ईस्ट बंगालच्या चाहत्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला 14 व्या मिनिटाला इंटर काशीच्या अल्फ्रेड प्लानासनं गोल करून ईस्ट बंगालला मोठा धक्का दिला आणि सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. 1 गोलनं पिछाडीवर असलेल्या ईस्ट बंगालनं उत्तरार्धात अत्यंत आक्रमक आणि वेगवान खेळ केला. सामन्याच्या 50 व्या मिनिटाला ‘गोल्डन बूट’ विजेता युसूफ एझेजारी यानं अप्रतिम मैदानी गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर 72 व्या मिनिटाला मोहम्मद रशीदनं कोपऱ्यातून आलेल्या पासवर उत्कृष्ट हेडर मारत दुसरा गोल केला. हा गोल सामन्यात निर्णायक ठरला आणि ईस्ट बंगालनं 2-2 नं विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

या विजयामुळे असा केला ईस्ट बंगालनं पराक्रम
ईस्ट बंगालनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताची सर्वोच्च फुटबॉल राष्ट्रीय लीग जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी त्यांनी 2003-04 मध्ये ‘नॅशनल फुटबॉल लीग’ (NFL) जिंकली होती, जी आताच्या आयएसएलच्या दर्जाची मानली जात असे. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच आयएसएल चषक ठरला आहे. याशिवाय, याच हंगामात ईस्ट बंगालच्या महिला संघानं ‘इंडियन वूमेन्स लीग’ (IWL) चे जेतेपद पटकावल्यामुळे, एकाच हंगामात पुरुष आणि महिला दोन्ही सर्वोच्च लीग जिंकणारा तो भारतातील पहिलाच फुटबॉल क्लब ठरला आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.