मेस्सीने पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर ३-० ने विजय

Fifa world cup 2026: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं (Argentina) आपल्या जेतेपदाच्या बचावाची धमाकेदार सुरुवात केली आहे. आज (१७ जून) ‘गट ज’ (Group J) मधील खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनानं आफ्रिकन बलाढ्य संघ अल्जेरियाचा ३-० असा धुव्वा उडवला. अमेरिकेतील कॅन्सस सिटी येथील प्रसिद्ध ‘अ‍ॅरोहेड स्टेडियमवर’ (Arrowhead Stadium) हा ऐतिहासिक सामना पार पडला.

मेस्सीची ऐतिहासिक हॅटट्रिक
या सामन्यात संपूर्ण वर्चस्व राहिलं ते फुटबॉलचा बादशाह कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi), ज्यानं सामन्यात सर्वाधिक ३ गोल करत आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील पहिली हॅटट्रिक साजरी केली. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला मेस्सीनं एक अप्रतिम मैदानी गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात, ६० व्या मिनिटाला गोलरक्षकाच्या चुकीचा फायदा घेत दुसरा आणि ७६ व्या मिनिटाला आपला ट्रेडमार्क क्लास दाखवत तिसरा गोल डागून अर्जेंटिनाचा ३-० असा एकतर्फी विजय निश्चित केला. या हॅटट्रिकसह मेस्सीनं विश्वचषकात एकूण १६ गोल पूर्ण करत जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसच्या (Miroslav Klose) सर्वाधिक गोलच्या सर्वकालीन जागतिक रेकॉर्डची बरोबरी केली.

या दणदणीत विजयामुळे अर्जेंटिनानं ३ गुणांसह ‘ग्रुप जे’ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. आता अर्जेंटिनाचा या ग्रुपमधील पुढील अत्यंत महत्त्वाचा सामना २२ जून २०२६ रोजी ऑस्ट्रियाविरुद्ध खेळवला जाईल, तर दुसरीकडे पराभूत झालेला अल्जेरियाचा संघ पुनरागमन करण्यासाठी त्याच दिवशी जॉर्डनविरुद्ध मैदानात उतरेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.