इटालियन ओपन: जॅनिक सिनर उपांत्यपूर्व फेरी; जोकोविचच्या विक्रमाशी केली बरोबरी

Italian Open: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरनं (Jannik Sinner) आपल्या मायदेशात सुरू असलेल्या ‘इटालियन ओपन 2026’ (रोम मास्टर्स) टेनिस स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील (Round of 16) लढतीत सिनरनं शानदार विजय मिळवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) धडक मारली आहे. या ऐतिहासिक विजयाच्या जोरावर त्याने एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

मंगळवारी (12 मे) झालेल्या या लढतीत अव्वल मानांकित जॅनिक सिनरनं पात्रता फेरीतून पुढे आलेल्या इटलीच्याच अँड्रिया पेलेग्रिनोचा (Andrea Pellegrino) अवघ्या 88 मिनिटांत 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, या दोन्ही खेळाडूंच्या कारकिर्दीतील हा दुसरा अधिकृत सामना होता. यापूर्वी 7 वर्षांपूर्वी 2019 मध्ये एका लहान आयटीएफ स्पर्धेत हे खेळाडू आमनेसामने आले होते, जिथे सिनरनंच बाजी मारली होती. कालच्या सामन्यात सिनरनं सुरुवातीपासूनच आक्रमक बेसलाईन शॉट्स खेळत पहिल्या सेटमध्ये 4-0 अशी भक्कम आघाडी घेतली आणि 6-2 ने सेट खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये पेलेग्रिनोने 3-3 अशी थोडी प्रतिकारशक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र सिनरनं आपल्या अनुभवाच्या जोरावर सलग तीन गेम्स जिंकून शानदार विजयाची नोंद केली.

सिनर म्हणाला, “आम्ही सात वर्षांपूर्वी एका खूप लहान कोर्टवर खेळलो होतो, त्यामुळे आज इथे मुख्य कोर्टवर खेळताना छान वाटले. जर तुम्हाला महान खेळाडू व्हायचे असेल, तर तुम्हाला सर्व स्पर्धांमध्ये तुमच्या सर्वोत्तम क्षमतेनं खेळावं लागतं. मैदानात शेवटी तुमची मानसिकता फरक निर्माण करते.

जोकोविचच्या 31 सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी
या विजयामुळे जॅनिक सिनरचा मास्टर्स 1000 स्पर्धांमधील विजयी रथ सलग 31 सामन्यांवर पोहोचला आहे. या कामगिरीसह त्याने सर्बियाच्या दिग्गज नोव्हाक जोकोविचच्या (Novak Djokovic) 2011 मधील सलग 31 मास्टर्स सामने जिंकण्याच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली. सामन्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत

आता उपांत्य फेरीत (Semifinals) जागा मिळवण्यासाठी जॅनिक सिनरचा पुढचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रशियाच्या 12 व्या मानांकित आंद्रे रुबलेव्ह (Andrey Rublev) विरुद्ध खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवल्यास सिनर जोकोविचला मागे टाकून मास्टर्स 1000 च्या इतिहासात सलग 32 सामने जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू ठरेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.