फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराझ दुखापतीमुळे माघार घेण्याचे संकेत

carlos alcaraz: टेनिस जगतातील युवा सुपरस्टार कार्लोस अल्काराझ (carlos alcaraz) याच्या उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे आगामी फ्रेंच ओपन 2026 (Roland Garros) मध्ये त्याच्या सहभागाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. सोमवारी (20 एप्रिल 2026) माद्रिद येथे पार पडलेल्या ‘लॉरेयस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स’ (Laureus World Sports Awards) कार्यक्रमादरम्यान अल्काराझनं स्वतः या शक्यतेबाबत भाष्य केलं आहे. त्यानं स्पष्ट केलं की, तो घाईनं पुनरागमन करण्याऐवजी पूर्णपणे फिट होण्याला प्राधान्य देईल.

कार्लोस अल्काराझला उजव्या मनगटाची (Right Wrist) गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत मागील आठवड्यात पार पडलेल्या ‘बार्सिलोना ओपन 2026’ मधील पहिल्या फेरीच्या सामन्यात झाली होती. फिनलंडच्या ओटो व्हर्टानन विरुद्धचा सामना 6-4, 6-2 असा जिंकत असतानाच त्याच्या मनगटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये ही दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचं निष्पन्न झालं.

दुखापतीच्या गांभीर्यामुळे अल्काराझला एकामागून एक महत्त्वाच्या स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली आहे. बार्सिलोना ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीनंतर स्पर्धा अर्धवट सोडली लागली. त्याच दुखापतीमुळे माद्रिद ओपन ही स्पर्धा 20 एप्रिलपासून सुरू होत असून त्यानं यातूनही अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यामुळेच आता इटालियन ओपन (रोम) या स्पर्धेतील सहभागावरही सध्या प्रश्नचिन्ह आहे, कारण तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

अल्काराझने लॉरेयस सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “मी घाईघाईनं परत येण्यापेक्षा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतणे अधिक चांगलं आहे. फ्रेंच ओपन ही माझ्यासाठी महत्त्वाची स्पर्धा आहे, पण माझ्या दीर्घकालीन कारकिर्दीसाठी ही दुखापत पूर्णपणे बरी होणे आवश्यक आहे”. त्यानं असंही नमूद केलं की, आगामी काही दिवसांतील वैद्यकीय चाचण्या त्याचं फ्रेंच ओपनमधील भवितव्य ठरवतील.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.