थायलंडकडून भारताचा पराभव

Billie Jean King Cup 2026: नवी दिल्लीतील डीएलटीए स्टेडियमवर सुरू असलेल्या बिली जीन किंग चषक 2026 (Billie Jean King Cup) स्पर्धेत यजमान भारतीय संघाला सुरुवातीलाच कठीण आव्हानाचा सामना करावा लागला आहे. 7 ते 11 एप्रिल या कालावधीत पार पडणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध झाला, जो पावसामुळे लांबला. पण सामना चालू झाल्यावर भारतीय संघाचा आणि थायलंडच्या अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाला थायलंडकडून 1-2 अशा फरकानं पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

सामन्याच्या सुरुवातीला भारतासाठी पदार्पण करणाऱ्या 18 वर्षीय वैष्णवी अडकरला अनुभवाच्या अभावामुळे अंचिसा चांटाकडून 1-6, 3-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात सहजा यमलापल्लीनं पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये 6-1 अशी दमदार कामगिरी करत पुनरागमन केलं होतं. मात्र, निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये थायलंडच्या पॅचरिन स्वस्तनं आपला अनुभव पणाला लावत सहजाचा 4-6, 6-1, 4-6 असा पराभव केला, ज्यामुळे भारतानं ही मालिका गमावली.

जरी एकेरीतील पराभवामुळे भारतानं सामना गमावला असला तरी, दुहेरीच्या सामन्यात अनुभवी अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले या जोडीनं थायलंडच्या जोडीला नमवून भारतासाठी एक महत्त्वाचा गुण मिळवला.

सध्याच्या गुणतालिकेत या पराभवामुळे भारत मध्यवर्ती स्थानावर असून दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया हे संघ सध्या आघाडीवर आहेत. भारताला या स्पर्धेत वरच्या स्थानावर पोहोचण्यासाठी आता आगामी सामन्यांमध्ये मोठ्या विजयांची आवश्यकता आहे.

भारताचा पुढचा सामना उद्या, 9 एप्रिल 2026 रोजी बलवान न्यूझीलंड विरुद्ध होणार असून, घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर भारतीय संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आणखी हेही वाचा
https://agcsport.tv/badminton/aayush-shettys-explosion-sindhu-advances-while-lakshya-sen-is-out/
https://agcsport.tv/other/indian-athletes-achieve-gold-in-issf-championship/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.