जोकोविचची ‘क्ले-कोर्ट’ हंगामाच्या सुरुवातीलाच माघार!

Novak Djokovic: टेनिस विश्वातील अव्वल खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक जोकोविचनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना निराश केलं आहे. खांद्याच्या जुन्या दुखापतीमुळे त्यानं 5 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या माँटे-कार्लो मास्टर्स स्पर्धेतून (Monte-Carlo Masters 2026) आपलं नाव मागे घेतलं आहे. 38 वर्षीय जोकोविचनं नुकत्याच संपलेल्या इंडियन वेल्स स्पर्धेत जॅक ड्रेपरकडून पराभव स्वीकारल्यानंतर एकही सामना खेळलेला नाही.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि महत्त्व
ही स्पर्धा फ्रान्समधील ‘रोकब्रेन-कॅप-मार्टिन’ येथील माँटे-कार्लो कंट्री क्लबमध्ये होणार असून स्पर्धा 5 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार आहे.

ही स्पर्धा एटीपी मास्टर्स 1000 (ATP Masters 1000) मालिकेतील महत्त्वाची स्पर्धा असून, युरोपमधील ‘क्ले-कोर्ट’ (Clay-court) हंगामाची ही अधिकृत सुरुवात मानली जाते. फ्रेंच ओपनच्या तयारीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते.

जोकोविचचा या स्पर्धेतील इतिहास
जोकोविचनं आतापर्यंत दोन वेळा (2013 आणि 2015 मध्ये) माँटे-कार्लो मास्टर्सचं विजेतेपद पटकावलं आहे. 2013 मध्ये त्यानं राफेल नदालचा पराभव करून या स्पर्धेतील नदालचं सलग 8 वर्षांचं वर्चस्व मोडीत काढलं होतं. तसेच त्यानं आतापर्यंत 24 वेळा ग्रँड स्लॅम जिंकण्याचा मानही मिळवला आहे.

जोकोविचच्या माघारीची अधिकृत घोषणा खुद्द जोकोविचनं न करता स्पर्धेच्या आयोजकांनी केली आहे. आयोजकांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram Story) जोकोविच स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जोकोविचने अद्याप आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यावर कोणतीही वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही.

आगामी काळात जोकोविच थेट माद्रिद ओपन (Madrid Open) मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जी 22 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.