अल्काराजला सेबॅस्टियनने केले पराभूत

Miami Open 2026: नुकत्याच झालेल्या मायामी ओपन 2026 मध्ये टेनिस जगताला एक मोठा धक्का बसला. आणि या स्पर्धेत मोठी उलटफेर झाली आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अल्काराझचा सेबॅस्टियन कोर्डानं पराभव केला आहे. आणि त्यामुळे कार्लोसचा या स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे. मागील वर्षी डेव्हिड गॉफिननं अल्काराझला याच स्पर्धेत हरवलं होतं, त्यानंतर कोर्डा हा त्याला हरवणारा सर्वात कमी मानांकित खेळाडू ठरला आहे.

कसा झाला पराभव?
सेबॅस्टियन कोर्डानं आक्रमक सुरुवात करत पहिला सेट 6-3 असा खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये कोर्डा 5-4 आणि स्वतःच्या सर्व्हिसवर असताना त्यानं सामना संपवण्याची संधी गमावली, ज्यामुळे अल्काराझनं सलग पाच गेम्स जिंकत सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये कोर्डानं पुन्हा एकदा नियंत्रण मिळवत 4-3 अशी ब्रेकची आघाडी घेतली आणि सामना आपल्या नावे केला. हा सामना जवळपास 2 तास 19 मिनिटांच्या लढतीनंतर सेबॅस्टियन यानं जिंकला. या पराभवामुळे कार्लोसचं या स्पर्धेतील आव्हान सुद्धा संपुष्टात आलं आहे.

अल्काराझचा अलीकडील झालेला पराभव
अल्काराझसाठी हा सलग दुसरा मोठा धक्का आहे. अवघ्या एका आठवड्यापूर्वीच इंडियन वेल्स 2026 च्या उपांत्य फेरीत त्याला दानिल मेदवेदेवनं (Daniil Medvedev) पराभूत केलं होतं. या पराभवानंतरही अल्काराझ सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल (World No. 1) स्थानी कायम आहे, पण सध्या जॅनिक सिनरला आता रँकिंगमध्ये जवळ येण्याची संधी मिळाली आहे.

सेबॅस्टियन कोर्डानं या विजयामुळे पहिल्यांदाच जागतिक नंबर १ खेळाडूला हरवण्याचा पराक्रम केला असून त्यानं चौथ्या फेरीत (Last 16) प्रवेश केला आहे.

पुढील फेरीत कोर्डाचा सामना 20 वर्षीय क्वालिफायर मार्टिन लांडाल्युस (Martin Landaluce) याच्याशी होणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.