विराट कोहली

    0
    13
    Virat Kohli is one of the greatest batsmen in the history of Indian cricket. Virat Kohli is one of the leading players in the world today, a record-breaking player.
    virat kohli biography

    आधुनिक क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाजांपैकी एक म्हणून विराट कोहली यांचे नाव घेतले जाते. आक्रमक फलंदाजी, फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक विक्रम आपल्या नावावर करत त्यांनी भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली.

    सुरूवातीचं जीवन
    विराट कोहली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्ली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना क्रिकेट अकादमीत दाखल केले आणि तिथूनच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली. शालेय आणि स्थानिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

    आंतरराष्ट्रीय पदार्पण
    विराट कोहली यांनी २००८ साली भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पहिला एकदिवसीय सामना श्रीलंका संघाविरुद्ध खेळला. सुरुवातीला त्यांना मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संधी मिळाली, पण त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ते लवकरच भारतीय संघातील सर्वात महत्त्वाचे फलंदाज बनले.

    विक्रम
    विराट कोहली यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.

    • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० पेक्षा जास्त धावा.
    • एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५३ पेक्षा जास्त शतके झळकावणारे खेळाडू.
    • आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक २०११ विजेत्या भारतीय संघाचा भाग.
    • आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०१३ विजेत्या भारतीय संघात महत्त्वाची भूमिका.
    • आयसीसी टी२० विश्वचषक २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग.
    • आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक २००८ मध्ये कर्णधार म्हणून विजेता.
    • जगातील सर्वात वेगाने अनेक धावांचे विक्रम करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्यांची गणना होते.

    नेतृत्व आणि शैली
    विराट कोहली हे अत्यंत आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी काही वर्षे भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक मालिका जिंकल्या.

    त्यांची फलंदाजी शैली आक्रमक आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे. विशेषतः धावांचा पाठलाग करताना (चेस करताना) ते जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातात.

    पुरस्कार आणि सन्मान
    विराट कोहली यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.

    • २०१३ मध्ये अर्जुन अवार्ड मिळाला.
    • २०१७ मध्ये पद्मश्री मिळाला.
    • २०१८ मध्ये राजीव गांधी खेल रत्न (मेजर ध्यानचंद खेल रत्न अवार्ड)
    • २०१८-१९ विस्डेन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 
    • आयसीसी कडून अनेक वेळा आयसीसी प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार

    विराट कोहली यांचा पदार्पण आणि शेवटचा सामना
    आंतरराष्ट्रीय

    कसोटी
    पदार्पण– भारत विरुद्ध वेस्टइंडिज, किंगस्टन – जुन २०-२३, २०११
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी – जानेवारी ०३-०५, २०२५

    एकदिवसीय
    पदार्पण– भारत विरूद्ध श्रीलंका, डंबुला- ऑगस्ट १८, २००८
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध न्यूझीलंड, इंदोर – जानेवारी १८,२०२६

    टी२०आय
    पदार्पण– भारत विरूद्ध झिम्बाव्बे, हरारे- जुन १२, २०१०
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका ब्रीजटाऊन – जुन २९, २०२४

    आयपीएल
    पदार्पण– रॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरूद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स, बंगळुरू- एप्रिल १८, २००८
    शेवटचा सामना–  रॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरूद्ध गुजरात टायटन्स, अदमदाबाद – एप्रिल ३०, २०२६

    निष्कर्ष
    विराट कोहली हे आधुनिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी खेळाडूंमध्ये गणले जातात. त्यांच्या मेहनतीमुळे, फिटनेस आणि उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्यांनी भारतीय क्रिकेटला नवी उंची दिली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. आणि त्याच्या मदतीने भारताला अनेकवेळा ट्रॉफी जिंकवल्या आहेत. त्यांनी वैयक्तिक अनेक विक्रमही केले आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतात त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतात.

     

    Player Biography
    Full Nameविराट कोहली
    SportCricket
    CountryIndia
    Gendermale
    Playing Roleउजव्या हाताचा फलंदाज
    Date of Birth05/11/1988
    Total Matches
    Highest Score
    Total Career Score
    Latest Match
    Awards
    Previous articleराहुल द्रविड
    Next articleसविता पुनिया
    Akash_Sonawane
    AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.