भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक नाव म्हणजे कपिल देव. आक्रमक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि प्रेरणादायी नेतृत्व यामुळे त्यांनी भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकत इतिहास रचला. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या प्रगतीमध्ये कपिल देव यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
सुरूवातीचे जीवन
६ जानेवारी १९५९ रोजी चंदिगडमध्ये कपिल देव यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलाला अभ्यासापेक्षा मैदानात जास्त रस होता. “भारतात फास्ट बॉलर तयार होऊ शकत नाही” हे चॅलेंज स्वीकारून त्यांनी सेक्टर १६ च्या स्टेडियमवर आपला सराव सुरू केला. तिथेच त्यांनी फास्टर बॉलर होणार या ध्येयाने सराव करत राहिले आणि भारताला उत्तम वेगवान गोलंदाज मिळाला.
आंतरराष्ट्रीय पदार्पण
१९७८ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध फैसालाबादमध्ये पदार्पण केले. आपल्या तुफानी वेगाने त्यांनी पहिल्याच सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांची झोप उडवली आणि जगाला भारताचा पहिला खरा ‘ऑलराउंडर’ मिळाला.
रेकॉर्ड आणि पुरस्कार
- १९८३ वर्ल्ड कप: झिम्बाब्वेविरुद्ध १७५ धावांची ऐतिहासिक खेळी आणि भारताला पहिले विश्वविजेतेपद मिळवून दिले.
- ४३४ टेस्ट विकेट्स: एकेकाळी जगात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता.
- दुहेरी पराक्रम: ५००० धावा आणि ४०० विकेट्स घेणारे ते कसोटी इतिहासातील एकमेव खेळाडू आहेत.
पुरस्कार
- त्यांना १९७९-८० साली अर्जुन पुरस्कार मिळाला आणि १९८२ मध्ये पद्मश्री, पद्मभूषण १९९१
- विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर: १९८३
- विस्डेनचा ‘इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी’ हा सन्मान २००२ मिळाला आहे.
- २०१० मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम समावेश झाला.
- सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार: २०१३
- भारत गौरव अवॉर्ड २०१९
कपिल देव यांचा पदार्पण आणि शेवटचा सामना
कसोटी
पदार्पण– भारत विरूद्ध पाकिस्तान, फैजाबाद- ओक्टोंबर १६-२१,१९७८
शेवट सामना– भारत विरूद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन- मार्च- १९-२३, १९९४
एकदिवसीय सामना
पदार्पण– पाकिस्तान वि. भारत, क्वेटा – ओक्टोंबर ०१, १९७८
शेवट सामना– भारत वि. वेस्ट इंडिज, फरियाबाद – ओक्टोंबर १७, १९९४
निष्कर्ष
कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटला ‘आपण जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास दिला. त्यांच्या १९८३ च्या विजयामुळेच भारतात क्रिकेट घराघरात पोहोचले. ते खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचे ‘महानायक’ आहेत.
| Full Name | कपिल देव |
| Sport | Cricket |
| Country | India |
| Gender | male |
| Playing Role | उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज |
| Date of Birth | 06/01/1959 |
| Total Matches | |
| Highest Score | |
| Total Career Score | |
| Latest Match | |
| Awards |

