उबेर कप 2026: 5-0 च्या निराशाजनक पराभवासह भारताचा प्रवास संपुष्टात

Uber Cup 2026: जागतिक बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठेच्या ‘उबेर कप 2026’ स्पर्धेत भारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मंगळवारी पार पडलेल्या ‘अ’ गटातील साखळी फेरीच्या सामन्यात बलाढ्य चीननं भारताचा 5-0 असा धुव्वा उडवला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरलेल्या भारतीय युवा संघाला चीनच्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी सावरण्याची एकही संधी दिली नाही.

असा झाला भारताचा पराभव
चीनच्या जागतिक मानांकित खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली होती. पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या इशारानी बरुआचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चेन युफेईनं 21-12, 21-10 असा सहज पराभव केला. दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताला मोठा धक्का बसला, जेव्हा उदयोन्मुख खेळाडू अनमोल खरब हिला हन युए विरुद्ध खेळताना पायाच्या दुखापतीमुळे (Ankle Injury) सामना अर्धवट सोडावा लागला. दुहेरीतही प्रिया कोन्जेन्बाम आणि श्रुती मिश्रा या जोडीला जगातील नंबर 1 जोडी चेन किंग चेन आणि जिया यी फान यांनी 21-13, 21-12 असे नमवले. उर्वरित सामन्यांतही तन्वी शर्मा आणि सिमरन सिंघी जोडीला हार मानावी लागली.

तर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या वांग झियी (Wang Zhiyi) हिनं दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूचा 16-21, 21-19, 19-21 अशा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. त्यामुळे या सगळ्यांचा पराभव झाल्यानं भारताचं महिला गटातील आव्हान संपलं आहे.

भारताची स्पर्धेतील सुरुवात
भारतीय महिला संघानं या स्पर्धेची सुरुवात आव्हानात्मक पद्धतीनं केली होती. पहिल्या सामन्यात यजमान डेन्मार्ककडून 2-3 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतानं कॅनडा आणि सिंगापूरवर मात करून आशा जागृत केल्या होत्या. मात्र, गटातील सर्वात मजबूत संघ असलेल्या चीनने भारताच्या सर्व आशांवर पाणी फेरलं.

चीनचं ऐतिहासिक वर्चस्व
उबेर कपच्या इतिहासात चीन हा जगातील सर्वात यशस्वी देश आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक 16 वेळा या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. भारतासाठी हा दौरा अनुभवाच्या दृष्टीनं मोलाचा ठरला असला तरी, बाद फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्यानं चाहत्यांमध्ये काहीशी निराशा आहे. ही स्पर्धा डेन्मार्कच्या ‘फोरम होर्सन्स’ मैदानावर 3 मे पर्यंत सुरू राहणार आहे.

आणखी हेही वाचा
मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर-https://agcsport.tv/cricket/mumbai-indians-main-spinner-out-of-ipl/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.