सुजीतने अंतिम फेरीत जपानी मल्लाचा पराभव करत मिळवले सुवर्णयश

Asian Wrestling Championships 2026: भारतीय कुस्तीचा नवा सुपरस्टार म्हणून उदयास आलेल्या सुजीत कलाकल यानं कजाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे झालेल्या ‘आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2026’ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

रविवारी (12 एप्रिल 2026) पार पडलेल्या पुरुष फ्रीस्टाईल 65 किलो वजनी गटाच्या थरारक अंतिम सामन्यात सुजीतनं जपानच्या ताकुमी तानियामाचा पराभव करून भारताला या स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. आपल्या वेगवान हालचाली आणि उत्कृष्ट बचावात्मक तंत्राच्या जोरावर सुजीतनं हा सामना 8-3 अशा गुणांच्या फरकानं जिंकत आशियाई कुस्तीत भारताचं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

या सुवर्णपदकाचा प्रवास सुजीतसाठी अत्यंत खडतर होता. त्यानं उपांत्य फेरीत इराणच्या बलाढ्य मल्लाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात सुरुवातीला जपानी मल्लानं दोन गुणांची आघाडी घेतली होती, पण सुजीतनं संयम न गमावता खेळाच्या उत्तरार्धात सलग गुणांची कमाई केली.

सुजीत कलाकल हा हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील असून, त्यानं यापूर्वी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं होतं. या विजयामुळे सुजीत आता 65 किलो गटात भारताचा सर्वात यशस्वी मल्ल म्हणून समोर आला आहे.

या स्पर्धेतील भारताच्या इतर कामगिरीचं सांगायच झालं तर, सुजीतच्या सुवर्णपदकाव्यतिरिक्त अमन सेहरावत (57 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) यांनी आपापल्या गटात रौप्य पदके पटकावली आहेत.

सुजीतच्या या यशामुळे भारतानं पुरुष फ्रीस्टाईल पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. या विजयानंतर सुजीतचं आता पुढचं मुख्य ध्येय आगामी ‘जागतिक कुस्ती अजिंक्यपद’ आणि त्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेवर असणार आहे. कजाकिस्तानमधील या विजयानं त्याचं जागतिक मानांकनही उंचावलं असून, तो आता जगातील अव्वल 5 मल्लांमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे.

आणखी हेही वाचा
फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: आर. वैशालीची जेतेपदाकडे कूच-
https://agcsport.tv/other/fide-candidates-chess-tournament-r-vaishali-marches-towards-title/

आयुष शेट्टीचे सुवर्णस्वप्न भंगलं; चीनच्या शी युकीकडून अंतिम फेरीत पराभव-https://agcsport.tv/badminton/aayush-shettys-golden-dream-shattered-lost-to-chinas-shi-yuqi-in-the-final/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.