भारताचे अनेक स्टार खेळाडू मलेशिया मास्टर्समधून बाहेर

Malaysia Masters 2026: मलेशियातील क्वालालंपूर येथील प्रसिद्ध अ‍ॅक्सियाटा अरेना (Axiata Arena) मैदानावर 19 ते 24 मे 2026 या कालावधीत प्रतिष्ठित ‘पेरोडुआ मलेशिया मास्टर्स 2026’ (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धा खेळवली जात आहे. भारतानं पी. व्ही. सिंधू आणि सात्विक-चिराग यांच्या अनुपस्थितीत 26 खेळाडूंचा ताफा या स्पर्धेत उतरवला आहे. मात्र, पहिल्या दोन दिवसांत भारताला पुरुष एकेरीसह महिला एकेरीतही मोठे धक्के बसले आहेत.

लक्ष्य सेन आणि प्रणॉय पहिल्याच फेरीत बाहेर
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत (Round of 32) भारताचे सर्वात मोठे आव्हान संपुष्टात आले. पॅरिस ऑलिम्पिकचा सेमीफायनलिस्ट आणि भारताचा अव्वल खेळाडू लक्ष्य सेनला इंडोनेशियाच्या अवघ्या 18 वर्षीय झाकी उबैदिल्लाहनं (Zaki Ubaidillah) अवघ्या 43 मिनिटांत 21-17, 21-1 असे सरळ गेममध्ये पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या बाजूला, माजी चॅम्पियन एच. एस. प्रणॉयला जपानच्या 6व्या मानांकित कोदाई नाराओकाविरुद्ध (Kodai Naraoka) 1 तास 20 मिनिटांच्या प्रदीर्घ लढतीनंतर 17-21, 22-20, 22-24 असा दुर्दैवी पराभव पत्करावा लागला. प्रणॉयनं दुसऱ्या गेममध्ये मॅच पॉईंट वाचवून पुनरागमन केलं होतं, मात्र निर्णायक गेममध्ये स्वतःचं 4 मॅच पॉईंट्स गमावणं त्याला महागात पडलं. याशिवाय तरुण मन्नेपल्ली आणि दुखापतीमुळे किरण जॉर्ज देखील पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

तर महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या इव्होन ली हिचा 21-17, 16-21, 21-9 असा पराभव करून भारताच्या आशा जिवंत ठेवणाऱ्या मालविका बन्सोडला (Malvika Bansod) आज दुसऱ्या फेरीत (Round of 16) पराभवाचा सामना करावा लागला. डेन्मार्कच्या 8 व्या मानांकित लाइन क्येरसफेल्ड (Line Kjærsfeldt) हिनं मालविकाचा 16-21, 21-8, 21-15 असा तीन गेमच्या लढतीत पराभव केला. मालविकानं पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती, मात्र पुढील दोन्ही गेममध्ये तिनं कोर्टवर अनेक ‘अनफोर्स्ड एरर्स’ (चुका) केल्या, ज्या तिला महाग पडल्या.

भारताचे स्पर्धेतील सद्यचित्र
महिला एकेरीत भारताच्या नवोदित खेळाडू देविका सिहाग (ज जिने दक्षिण कोरियाच्या पार्क गा-एनला 19-21, 21-18, 21-19 नं नमवलं) आणि पात्रता फेरीतून आलेली अश्मिता चालिहा यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरुष दुहेरीत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि हरीहरन अमशकारुणन जोडीनं फ्रान्सच्या 7व्या मानांकित पोपोव्ह बंधूंचा 21-19, 21-15 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत (Round of 16) स्थान मिळवलं आहे.

आता भारतीय चाहत्यांना आशा आहेत जे खेळाडू या स्पर्धेत टिकून आहेत ते पुढील सगळे सामने जिंकतील आणि विजयी होतील.

आणखी हेही वाचा
केकेआरला प्लेऑफसाठी पोहोचण्याचे गणित कसे आहे?-
https://agcsport.tv/cricket/what-are-the-odds-of-kkr-reaching-the-playoffs/?_thumbnail_id=1933

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.