फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: आर. वैशालीची जेतेपदाकडे कूच

FIDE Candidates 2026: सायप्रसमध्ये सुरू असलेल्या फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 मध्ये आता चुरस शिगेला पोहोचली असून भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या एकूण 14 फेऱ्यांपैकी 12 फेऱ्या आता पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेचा विजेता खेळाडू भारताच्याच डी. गुकेश (खुला विभाग) आणि जू वेनजुन (महिला विभाग) यांच्याविरुद्ध जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी लढणार आहे.

भारताचा एकमेव प्रतिनिधी आर. प्रज्ञानंद सध्या 4.5 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यानं स्पर्धेची सुरुवात डच ग्रँडमास्टर अनिश गिरीला हरवून दणक्यात केली होती, पण नंतरच्या फेऱ्यांत त्याला काही महत्त्वाचे गुण गमवावे लागले. 12 व्या फेरीत रशियाच्या आंद्रे एसिपेन्कोसोबत झालेला त्याचा सामना बरोबरीत (Draw) सुटला. सध्या उझबेकिस्तानचा जवाखिर सिंदारोव्ह 9 गुणांसह गुणतालिकेत नंबर 1 वर आहे आणि त्यानं या स्पर्धेत सर्वाधिक 6 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

दुसरीकडे, महिला विभागात भारताची आर. वैशाली सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्मात असून ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. 11 व्या फेरीत तिनं रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाचा पराभव करून एकल आघाडी घेतली होती. मात्र, 12 व्या फेरीत तिला चीनच्या झू जिनरकडून पराभव पत्करावा लागल्यानं सध्या वैशाली आणि झू जिनर 7 गुणांसह संयुक्तपणे नंबर 1 वर आहेत. दुसरीकडं, दिव्या देशमुख हिला या स्पर्धेत काही सलग पराभवांचा सामना करावा लागल्यानं ती सध्या सातव्या स्थानावर आहे.

आगामी 14 एप्रिल रोजी होणारी 13 वी फेरी या स्पर्धेचा निकाल ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. जर 14 फेऱ्यांनंतरही दोन खेळाडूंचे गुण समान राहिले, तर 16 एप्रिल रोजी टायब्रेकर सामने खेळवले जातील. संपूर्ण भारताचं लक्ष आता आर. वैशालीवर लागलं आहे, कारण ती महिला जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. या विजयानंतर ती थेट जू वेनजुनविरुद्ध ऐतिहासिक लढत खेळताना दिसू शकते.

आणखी हेही वाचा
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ: वैशालीचा विजय तर प्रज्ञानंदच्या आशा धूसर!-
https://agcsport.tv/other/candidates-chess-vaishali-wins-praggnanands-hopes-dim/

आशियाई बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांचा दबदबा; प्रीती पवारचे ‘सुवर्ण’ यश!-https://agcsport.tv/other/indian-women-dominate-in-asian-boxing-preeti-pawars-golden-success/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.