भारतीच्या निखत, प्रिया आणि प्रीती यांची सेमीफायनलमध्ये धडक!

Asian Elite Boxing Championships 2026: गोलियाची राजधानी उलानबातर (Ulaanbaatar) येथे सुरू असलेल्या आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 (Asian Elite Boxing Championships 2026) पाचव्या दिवशी (3 एप्रिल 2026) भारताच्या निखत झरीन, प्रिया आणि प्रीती पवार यांनी आपापल्या वजन गटात वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या विजयामुळे भारताची या स्पर्धेत किमान तीन पदके निश्चित झाली आहेत.

51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या निखत झरीननं फिलीपीन्सच्या झियान बागुहिनविरुद्ध सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं. निखतचं पंच इतके वेगवान आणि अचूक होते की, पहिल्याच फेरीत रेफ्रींना सामना थांबवून (RSC) तिला विजयी घोषित करावं लागलं. तर 54 किलो गटात प्रीती पवारनं यजमान मंगोलियाच्या मुंगुनत्सेतेंग हिचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून घरच्या प्रेक्षकांना शांत केलं, तसेच 60 किलो गटात प्रियानं चीनच्या चेंगयु यांगविरुद्ध 4-1 असा चिवट विजय मिळवून उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं.

भारताच्या या तिन्ही वीरांगना आता 7 आणि 8 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या उपांध्य फेरीच्या सामन्यांसाठी सज्ज झाल्या आहेत. निखतचा पुढील सामना चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या वू यू हिच्याशी होणार आहे, जो या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना मानला जात आहे. प्रीती आणि प्रिया यांचा सामना दक्षिण कोरिया आणि मंगोलियाच्या खेळाडूंशी होईल.

कोण आहेत या खेळाडू
निखत झरीन ही भारताची अनुभवी स्टार आणि दोन वेळची जागतिक सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे. प्रीती पवारनं नुकत्याच झालेल्या जागतिक चषकात सुवर्णपदक जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. तसेच प्रिया ही राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन जिनं आशियाई स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. या तिन्ही बॉक्सर्सनी ज्या प्रकारे विजय मिळवले आहेत, ते पाहता भारताला या स्पर्धेत सुवर्णपदकाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ही स्पर्धा 28 मार्च 2026 पासून मंगोलियात सुरू झाली असून 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.