मोहोळ, राक्षे यांसारखे दिग्गज मल्ल महाराष्ट्र केसरीतून बाहेर

maharashtra kesari 2026: पुण्यातील वाघोली येथील ‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’मध्ये सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आज, २२ मार्च २०२६ रोजी आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. काल, २१ मार्च रोजी झालेल्या उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेऱ्यांच्या अटीतटीच्या लढतींनंतर आता ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कालच्या सेमीफायनलच्या फेरीत दोन्ही विभागात मोठी चुरस पाहायला मिळाली. अनुभवी आणि ताकदवान मल्लांमध्ये झालेल्या लढतींमध्ये शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सुदर्शन कोतकर यांंसारखे मोठे खेळाडू स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे स्पर्धेला मोठे वळण आले आहे. आणि स्पर्धा आणखीनंच चुरशीची बनत चालली आहे.

काल झालेल्या सामन्यात माती विभागातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी दमदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आक्रमक आणि तांत्रिक खेळाने पराभूत करत गदा जिंकण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आजच्या अंतिम लढतीत या दोघांमध्ये थेट टक्कर होणार आहे.

दुसरीकडे, गादी (मॅट) विभागातही तितकीच रोमांचक परिस्थिती पाहायला मिळाली. गेल्या वर्षीचा विजेचा आणि ज्याला यावर्षीचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं त्या पृथ्वीराज मोहोळला सोलापुरच्या जय पाटील याने अवघ्या ४० सेकंदाच्या आतच आस्मान दाखवलं. त्यामुळे चाहत्यांना आणि त्याला हा धक्काच बसला आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यानी शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता आज (22 मार्च) जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात गादीवरची फायनल सामना खेळवला जाईल.

आज, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सत्रात या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. प्रथम गादी आणि माती विभागातील आपापल्या फायनल होतील, आणि त्यानंतर या दोन्ही विभागांतील विजेते मल्ल मानाच्या ‘चांदीच्या गदेसाठी’ आमनेसामने येतील.

आजच्या अंतिम सामन्यात जो मल्ल विजय मिळवेल, त्याला टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) गाडी आणि मानाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येईल, तर उपविजेत्याला स्कॉर्पिओ एन (Scorpio N) गाडी मिळेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.