IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये आज (बुधवार, 8 एप्रिल 2026) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा रोमांचक सामना दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या कमालीच्या फॉर्मात असून त्यांनी यंदाच्या हंगामातील सुरुवातीचं दोन्ही सामने (लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध) जिंकले आहेत. या विजयामुळे सध्या 4 गुणांसह दिल्ली गुणतालिकेत चौथ्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसरीकडं, गुजरात टायटन्सची सुरुवात यंदा अत्यंत निराशाजनक झाली असून, पंजाब आणि राजस्थान विरुद्ध झालेल्या पराभवामुळे ते अद्याप विजयाचे खाते उघडू शकलेले नाहीत. सध्या शून्य गुणांसह गुजरात नवव्या स्थानावर असून त्यांना आज स्पर्धेतील पहिले गुण मिळवण्याचे मोठे आव्हान असेल.
जर आयपीएलमधील या दोन्ही संघाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. यात गुजरात टायटन्सचं पारडं किंचित जड असून त्यांनी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सला 3 सामन्यांत बाजी मारता आली आहे. जरी आकडेवारी गुजरातच्या बाजूनं असली, तरी दिल्लीचा सध्याचा फॉर्म पाहता घरच्या मैदानावर त्यांचे पारडं जड दिसत आहे. विशेषतः दिल्लीचा युवा फलंदाज समीर रिझवी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यानं मागील दोन्ही सामन्यांत अर्धशतके झळकावून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग 11
दिल्ली कॅपिटल्स (DC): के. एल. राहुल, पाथुम निसंका, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), विप्रज निगम, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि लुंगी न्गिडी.
गुजरात टायटन्स (GT): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवातिया, रशीद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अशोक शर्मा.
आणखी हेही वाचा
https://agcsport.tv/ipl-2026/rajasthans-royal-victory-in-guwahati-mumbais-second-consecutive-defeat/
https://agcsport.tv/ipl-2026/how-is-csks-record-without-dhoni/

