IPL 2026 MS Dhoni: आयपीएल 2026 च्या सुरूवातीलाच चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी समोर आली आहे. सीएसके (CSK) संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याच्या पायाच्या दुखापतीमुळे सुरूवातीचे दोन आठवडे त्याला खेळता येणार नाही. या दुखापतीमुळे धोनी राजस्थान, पंजाब आणि बेंगलोर विरूद्ध होणाऱ्या या तीन सामन्यांमधून बाहेर राहणार आहे.
एमएस धोनी IPL 2026 च्या सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर झाला आहे. शनिवारी (28 मार्च) चेन्नई सुपर किंग्सनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या माहितीमध्ये सांगितलं आहे की, धोनीच्या पायाच्या मांसपेशीमध्ये ताण आला आहे. याच कारणामुळे धोनी कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत IPL खेळू शकणार नाही. त्यामुळे सीएसकेला सुरूवातीचे काही सामने धोनीशिवाय खेळावे लागणार आहेत.
Official Statement
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2026
MS Dhoni is currently undergoing rehabilitation for a calf strain. As a result, he is likely to miss the first two weeks of TATA IPL 2026.
Get well soon, Thala! 💛🦁 pic.twitter.com/4dgmt5EWFi
3 सामने धोनी राहणार बाहेर
धोनी 2 आठवडे म्हणजेच 14 दिवस बाहेर राहणार आहे. आणि याचा परिणाम सीएसकेवर पडू शकतो. चेन्नई आपली पहिली मॅच 30 मार्च ला गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स विरूद्ध खेळणार आहे. यानंतर दुसरा सामना 3 एप्रिल ला चेन्नईच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्स सोबत खेळणार आहे. आणि तिसरा सामना 5 एप्रिलला गतवर्षीचा विजेता राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या विरूद्ध खेळणार आहे. आणि धोनी या तिनही सामन्यात खेळणार नाही.
धोनी कधी करणार पुनरागमन
धोनीचे सगळे चाहते तो कधी खेळणार याची वाट पाहत आहेत. जर धोनी 2 आठवड्यानंतर चांगला फिट राहिला तर त्याचं पुनरागमन 11 एप्रिलला होऊ शकतं. या दिवशी सीएसके दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध खेळणार आहे. तोपर्यंत संघातील खेळाडूंना धोनीशिवाय चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
याआधी सुद्धा अनेक खेळाडू सीएसकेमधून बाहेर
चेन्नई सुपर किंग्सला हा पहिलाच धक्का नाही. कारण याआधी सुद्धा नेथन एलिस हा यंदाचा पुर्ण हंगाम खेळणार नाही. याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्यामुळे तो संपुर्ण हंगाम बाहेर असणार आहे. तर मॅथ्यू शॉर्ट हा सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे असं सांगितलं जात आहे. आणि आता धोनी सुद्धा काही सामने बाहेर आहे त्यामुळे कर्णधार ऋृतुराज गायकवाड हा संघ कसा सांभाळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

