IPL 2026 RCB vs SRH: काल (28 मार्च) बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात आयपीएल 2026 चा पहिला सामना झाला. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला असून आरसीबीनं पहिल्याच सामन्यात सनराजर्सचा एकतर्फी पराभव केला.
आरसीबीनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीलाच म्हणजेच 29 धावांवर हैदराबाद संघाच्या 3 विकेट्स पडल्या होत्या. यात अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि नीतीश कुमार रेड्डी अशा तिघांच्या विकेट्स लवकर गेल्यामुळे संघावर दबाव आला होता. अनेकांना वाटत होतं हैदराबादला जास्त काही धावा करता येणार नाहीत पण कर्णधार इशान किशन यानं एक चांगली खेळी केली. यानं 5 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीनं 38 चेंडूत 80 धावा केल्या. तसेच क्लासेन 31 (22 चेंडू), अनिकेत वर्मा 43 (18 चेडू) यांच्या मदतीनं हैदराबाद संघानं 201 धावा केल्या.
प्रत्युत्तरात उतरलेल्या आरसीबीनं हैदराबादच्या सगळ्या गोलंदाजांना धुवून काढलं आहे आणि हा (201) धावांचा टप्पा कमी षटकांतच पार केला. सुरूवातीला आरसीबी संघालाही फिल सॉल्ट याच्या रूपात पहिला झटका बसला होता. पण इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कल यानं हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलचं धुतलं. त्यानं 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं 61 धावा काढल्या आणि आरसीबीला मजबूत स्थितीत आणलं.
दुसरीकडं विराट कोहलीनं त्याची साथ दिली, विराटनं नाबाद 69 धावांची खेळी केली. यात त्यानं 5 षटकार आणि 5 चौकार लागावले. तसेच आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यानंही चांगली खेळी करून बाद झाला. रजत बाद झाल्यावर विराटला साथ देण्यासाठी टीम डेव्हिड आला. मग शेवटी विराटनं विजयी चौकार लावला. आरसीबीनं 15. 4 चेंडूतच 201 धावांच असलेल लक्ष्य एकतर्फीच पार केलं.
गेम कुठे फिरला?
हर्षल पटेल ज्यावेळी 8 व्या षटकात गोलंदाजी करण्यात आला तेव्हा विराट कोहली फलंदाजी करत होता. तेव्हा विराटनं फक्त 28 धावा केल्या होत्या. हर्षलनं चेंडू फेकला आणि विराटनं मारलेला तो चेंडू सगळ क्लासेनकडे गेला. पण क्लासेनला तो झेल पकडता आला नाही. आणि तिथेच सामनाही फिरला. आणि विराटनंच ही मॅचही जिंकून दिली.
या सगळ्या इनिंगमध्ये सगळ्यांचे लक्ष ज्यानं वेधलं तो आरसीबीचा खेळाडू जोकोब डफी होता. यानं आपल्या IPL पदार्पणातच 4 षटकांत (ओव्हर्स) फक्त 22 धावा खर्च करून 3 विकेट घेतल्या. आणि पहिल्याच सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला.

