KKR vs PBKS 2026: आयपीएल 2026 मधील आजचा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांपैकी असलेला एक सामना आहे. हा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे.
सलग दोन पराभवांमुळे केकेआरचा संघ सध्या गुणतालिकेत 0 गुणांसह 9 व्या स्थानावर संघर्ष करत असून, त्यांना यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी गुजरात आणि चेन्नईला नमवून सलग 2 विजय नोंदवले आहेत. सध्या 4 गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत 4 थ्या स्थानावर विराजमान आहे.
जर केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यातील आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. यात कोलकत्त्याचं वर्चस्व अधिक असून त्यांनी 21 सामने जिंकले आहेत, तर पंजाबला 13 सामन्यांत बाजी मारता आली आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. विशेषतः ईडन गार्डन्सवर केकेआरचा रेकॉर्ड अतिशय चांगला असून येथे झालेल्या 14 पैकी 9 सामन्यांत त्यांनी पंजाबला धूळ चारली आहे. मात्र, मागील पाच लढतींपैकी चार सामने पंजाबनं जिंकल्यामुळे कोलकत्त्यावर आज मोठा दबाव असेल. पंजाब जर आजचा सामना जिंकला तर त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे.
आजची संभाव्य प्लेइंग 11 (Probable XI)
केकेआर (KKR): अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, कॅमरन ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी, ब्लेसिंग मुझाराबानी
पंजाब किंग्स (PBKS): प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल

