KKR IPL 2026: कोलकत्ता नाईट रायडर्स जेव्हा 29 मार्चला मुंबई इंडियन्स विरूद्ध आयपीएल 2026 चा पहिला सामना खेळेल त्यावेळी all rounder आंद्रे रसलची कमी नक्कीच भासेल. मागच्या वर्षी झालेल्या लिलावात फ्रेंचाइजीने रसलला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रसलने आयपीएल मधून निवृत्ती घेतली. आता केकेआरचा संघ आंद्रे रसलला संघासाठी “पॉवर कोच” म्हणून माघरी घेण्याचा विचार करत आहे. पण प्रश्न हा आहे की, यंदाच्या प्लेइंग 11 मध्ये त्याच्या जागी संघात कोणाला स्थान देयचं.
आयपीएलच्या आधीच एक पत्रकार परिषदेत मुख्य कोच अभिषेक नायरला आंद्रे रसल विषयी प्रश्न करण्यात आला? त्यावर त्यांनी सांगितलं की, “आंद्रे रसलनं गेली अनेक वर्ष संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्यानं जे काही केलं आहे त्याची बरोबरी करण सुद्धा अवघड आहे. दरम्यान, हा हंगाम अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी आहे. आमच्याकडं रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग आहे, जे पुढे चालून संघासाठी मोठी कामगिरी करतील, जसं की त्याने (रसल) पहिल्यांदा केली आहे”.
अभिषेक नायर यांनी पुढे हेही सांगितलं की, “आयपीएल खेळताना खेळाडूंवर अनेकदा दबाव असतो. पण आम्हाला वाटत की, खेळाडूंनी कोणताही दबाव न घेता चांगलं प्रदर्शन करावं आणि स्वत: चं नाव मोठं करावं. आमच्या संघात अनेक नवीन खेळाडू आहे. जे पुढं चालून इतिहासात आपलं नाव नोंदवतील. रिंकू सिंगनं ही जबाबदारी आतापर्यंत चांगली पार पाडली आहे. तसेच रमणदीप सुद्धा चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहेत की, यावर्षी सुद्धा ते चांगलं प्रदर्शन करतील आणि संघासाठी खास काही तरी करून दाखवतील”.
आंद्रे रसलची आयपीएल मधील कामगिरी
रसलेने आयपीएलच्या 13 हंगामात, 140 सामन्यांत 174.2 च्या स्ट्राईक रेटनं 2651 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत सुद्धा त्यानं आपली चमक दाखवली आहे. रसलनं 123 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. अनेकवेळा त्यानं संघाला कठीन सामन्यांतून बाहेर काढून मॅचही जिंकून दिल्या आहेत. तसेच तो अनेक वर्ष वेगवेगळ्या कर्णधाराच्या हाताखाली खेळला आहे.

