दोन्ही संघातील स्टार खेळाडू बाहेर; काय आहे आजची प्लेइंग 11

IPL 2026 KKR vs MI: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2026 मध्ये आजचा सामना पाच वेळा विजेतेपद असलेला Mumbai Indians आणि तीन वेळा विजेतेपद जिंकलेल्या Kolkata Knight Riders यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार असून दोन्ही संघ आपल्या हंगामाची विजयी सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई इंडियन्सच्या संघात सध्या त्यांचे काही खेळाडू सुरूवातीचे काही सामने खेळणार नाहीत. कारण Atharva Ankolekar हा दुखापतीमुळे बाहेर असल्याच सांगितलं जात आहे. तसेच काही परदेशी खेळाडू जसं की, मिचेल सेंटनर (Mitchell Santner) आणि विल जॅक्स (Will Jacks) हे पहिल्या सामन्यात उपलब्ध नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंमुळे मुंबईचा संघ मजबूत दिसत आहे.

दुसरीकडं तर केकेआरच्या संघाला आयपीएलच्या सुरूवातीच्या आधीच खूप मोठे धक्के बसले आहेत. कारण त्यांच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक असलेला हर्षित राणा (Harshit Rana) हा संपुर्ण काळ आयपीएल हंगामाला मुकणार आहे. आकाश दीप (Akash Deep) आणि मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) हे दोघ सुद्धा सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नाही. यामुळे केकेआरची बॉलिंग लाईनअप थोडीफार कमकुवत झाली असं दिसून येत आहे.

head to head रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सचा कोलकत्ता विरुद्धचा रेकॉर्ड मजबूत आहे. यांच्यात आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. त्यातले केकेआपनं 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 24 सामन्यांत पराभव मिळाला आहे. दुसरीकडं मुंबई इंडियन्सनं 24 सामन्यांत विजय आणि 11 सामन्यात पराभन स्विकारला आहे. विशेषतः वानखेडे स्टेडियमवर केकेआरनं 12 पैकी 10 सामने गमावले आहेत ज्यामुळे या रेकॉर्ड्स वरून हेच दिसतंय की, मुंबईचा दबदबा केकेआर संघावर आहे.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11– कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेर्फेन रदरफोर्ड, दीपक चहर, ट्रेंड बोल्ट, जरप्रीत बुमराह, नमन धीर, कार्बोन बॉश

केकेआर संभाव्य प्लेइंग 11– कर्णधार अजिंक्य रहाणे, सुनिल नारायण, राहुल त्रिपाटी, टीम सायफर्ड, फिन ॲलन, रचिन रवींद्र, रिंकू सिंग, कॅमरन ग्रीन, वरूण चक्रवर्ती, वैभव अरोरा, उमरान मलिक

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.