रिंकू सिंगची आयपीएल आधीच लागली लॉट्री

IPL 2026 KKR: कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) संघानं आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी नाइट्स अनप्लग्ड 3.0 या कार्यक्रमात रिंकू सिंग (Rinku Singh) याची अधिकृतपणे उपकर्णधार (Vice-Captain) म्हणून नियुक्ती केली आहे. संघानं अनुभवी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) या हंगामासाठी कर्णधारपदी कायम ठेवलं असून रिंकू त्याच्या हाताखाली उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल.

त्याला ही जबाबदारी का देण्यात आली?
मुख्य कोच अभिषेक नायर यांनी सांगितलं की, “मला वाटतं हे अगदी योग्य आहे, कारण केकेआरमध्ये आल्यावर आणि सपोर्ट स्टाफचा भाग झाल्यावरची माझी पहिली आठवण रिंकू सिंगसोबत काम करण्याची होती. त्यामुळे आता मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारताना, मला वाटतं की गेल्या काही वर्षांत आपण रिंकू सिंगला फक्त एक क्रिकेटपटू म्हणूनच नव्हे, तर एक नेता म्हणूनही विकसित होताना पाहिलं आहे. त्याची कामगिरी स्वतःच बोलत असली तरी, मला वाटतं की मैदानाबाहेर जास्त काही न बोलताही तो एक असा खेळाडू आहे, ज्याच्याकडे संघ नेहमीच आशेनं पाहतो,” असं नायर म्हणाले.

आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर हे अनुभवी खेळाडू आता संघात नसल्यानं, मधल्या फळीत रिंकूनं अधिक जबाबदारीनं खेळावं आणि संघाला दिशा द्यावी, अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. रिंकू 2026 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता, ज्यामुळे त्याच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली आहे. तसेच केकेआर फ्रँचायझीनं भविष्यातील नेतृत्वाच्या दृष्टीनं एक मोठा निर्णय घेत रिंकू सिंगला उपकर्णधार बनवलं आहे असं यातून दिसत आहे.

किती वर्षांपासून खेळत आहे?
रिंकू सिंग 2018 पासून केकेआरशी जोडलेला आहे. 2018 च्या लिलावात त्याला 80 लाख रुपयांना विकत घेण्यात आलं होतं. त्यानं आतापर्यंत केकेआरकडून एकूण 59 सामने खेळले आहेत. या 59 सामन्यांमध्ये त्यानं 30.53 च्या सरासरीनं आणि 145.18 च्या स्ट्राईक रेटनं 1099 धावा केल्या आहेत.

केकेआरचा पहिला सामना
कोलकत्ता नाईट रायडर्स आपला आयपीएल 2026 चा पहिला सामना 29 मार्चला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.