इतिहासात पहिल्यांदाच सर्व संघाचे कर्णधार भारतीय

IPL 2026: हंगामाची सुरुवात होत असताना यंदा एक ऐतिहासिक गोष्ट पाहायला मिळत आहे. आयपीएल इतिहासात (2008 पासून) पहिल्यांदाच असं घडले आहे की, स्पर्धेतील सर्व संघांचे कर्णधार भारतीय खेळाडू आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटमधील नेतृत्वगुणांची ताकद स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे युवा आणि अनुभवी खेळाडूंना मोठी संधी मिळाली आहे.

चेन्नई सुपर किंग्स (CSK)
२००८ पासून सीएसकेच नेतृत्त्व भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी करत होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत सीएसकेला अनेकदा फायनलला घेऊन गेला आहे आणि विजयही मिळवून दिला आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वात ५ आयपीएल किताब जिंकले आहेत. पण २०२४ मध्ये एमएस धोनीने कर्णधारपद सोडले आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूकडे सोपवण्यात आलं. ऋतुराजनेही अनेक सामन्यांत सीएसकेला विजय मिळवून दिला आहे.

मुंबई इंडियन्स (MI)
मुंबई इंडियन्स या संघाने अनेक खेळाडूंचं नेतृत्त्व पाहिलं आहे. त्यात भारतीय आणि परदेशी खेळाडू सुद्धा आहेत. पण रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सला वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवलं. त्याने ५ आयपीएल किताब जिंकून दिले आहेत. पण २०२४ मध्ये त्याला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पंड्या याला करण्याच आलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
आरसीबी या फ्रेंचायजीने सुद्धा अनेकदा परदेशी खेळाडूचं नेतृत्त्व पाहिलं आहे. पण यात सगळ्यात यशस्वी रजत पाटीदार हा खेळाडू ठरला. कारण त्याला पहिल्यांदाच(2025) कॅप्टन करण्यात आलं आणि त्याने त्याच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबीली पहिले जेतेपद मिळवून दिले. आणि आजही तो आरसीबीचा कर्णधार म्हणून भूमिका बजावत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
केकेआर संघ या सगळ्यात यशस्वी संघापैकी एक आहे. या संघाचेही अनेक कर्णधार परदेशी खेळाडू राहिले आहेत. श्रेयस अय्यर हा केकेआर मधून दुसऱ्या संघाकडून गेल्यावर भारताचाच खेळाडू अजिंक्य रहाणे याला कर्णधार (2025) करण्यात आलं. तेव्हापासून राहाणे हाच केकेआरचा कर्णधार आहे.

दिल्ली कॅपिटल्स (DC)
दिल्ली हा संघ अधिक परदेशी कर्णधार बदलणाऱ्या संघापैकी एक आहे. जो अनेक परदेशी खेळाडूंच्या नेतृत्त्वात खेळला आहे. James Hopes, Mahela Jayawardene असे अनेक इतर देशांतील खेळाडूंनी दिल्लीचे कर्णधारपदाची भूमिका पाडली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दिल्लीचा कर्णधार भारतीयचं आहे. तसेच ऋषभ पंत हा २०२५ ला इतर संघाकडून गेल्यावर भारताचा all rounder अक्षर पटेल याला दिल्लीचा कर्णधार करण्यात आला.

गुजरात टायटन्स (GT)
गुजरात हा संघ २०२२ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये उतरला. त्याचा पहिला कर्णधार भारतीयच होता. त्यानंतर हार्दिक पंड्या मुंबईमध्ये गेल्यावर भारताता कर्णधार शुभमन गिल याला कर्णधारपद सोपविण्यात आलं. आणि आताही ते कर्णधारपद त्याच्याकडेच आहे.

राजस्थान रॉयल्स (RR)
२००८ ला ज्यावेळी आयपीएलचा पहिला हंगाम चालू झाला त्यावेळीच या संघाचा कर्णघार परदेशी खेळाडू होता. तो म्हणजे शेन वार्न. यांनी पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद जिंकून दिले. त्यानंतर विविध देशांतील खेळीडूंनी या संघाचे कर्णधारपदाची भूमिका बजावली. पण २०२१ पासून या संघाचा कॅप्टन भारतीय राहिला. यंदाच्या हंगामात संजू सॅमसन हा सीएसकेकडून आल्यामुळे कर्णधार बदलण्यात आला आहे. आणि रियान पराग या भारतीय खेळाडूला कर्णधार करण्यात आलं आहे.

पंजाब किंग्स (PBKS)
Punjab Kings हा संघ सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ आहे. त्यात अनेक इतर देशातील खेळाडूंचा सुद्धा सहभाह आहे. पण २०१८ पासून या संघाचा कर्णधार भारतीय खेळाडू राहिला आहे. सध्या पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर आहे. ज्याने गतवर्षी पंजाबच्या संघाला अनेक वर्षानंतर फायनलला नेऊन ठेवलं होतं. तसेच तो एकमेव कर्णधार आहे ज्याने आयपीएल इतिहासातील ३ वेगवेगळ्या संघांना फायनलला घेऊन गेला आहे.

लखनौ सुपर जायंट्स (LSG)
आयपीएलमध्ये २०२२ ला हा संघ पहिल्यांदा मैदानात उतरला. याही संघाने काही सामने परदेशी खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली खेळले आहेत. पण गेली अनेक वर्ष हा संघाचा कर्णधार भारतीय आहे. केएल राहुल या संघातून गेल्यापासून ऋषभ पंत हा सध्या संघाच कर्णधारपद भूषवित आहे. २०२५ पासून पंत या संघाच नेतृत्त्व करत आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH)
SRH हा एकमेव संघ आहे ज्याने भारतीय खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंना जास्त वेळा कर्णधारपद दिलं आहे. आतापर्यंत फक्त दोनच SRH चे भारतीय कर्णधार झाले आहेत. पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याने सनरायझर्स हैदराबादने इशान किशनला प्रभारी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, ज्यामुळे सर्व संघांच्या कर्णधारपदाची धुरा भारतीयांच्या खांद्यावर आली आहे. आणि हा या संघाचं नेतृत्त्व करणार तिसरा भारतीय खेळाडू आहे.

म्हणजे २०२६ या यंदाच्या वर्षी सगळ्या फ्रेंचायजीला भारतीय कर्णधार मिळाले आहेत. आणि हे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.