सीएसकेचा घरच्या मैदानावर सलग सहावा पराभव!

IPL 2026 CSK vs PBKS: आयपीएल 2026 मधील रोमांचक लढतीत पंजाब किंग्सनं (PBKS) यजमान चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 5 गडी राखून पराभव केला आहे. शुक्रवारी, 3 एप्रिल 2026 रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) हा सामना पार पडला. तर पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानात सलग सहाव्या पराभवाचा धक्का बसला आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाची प्रथम फलंदाजी आली. पण सुरूवातीलाच संजू सॅमसनच्या रूपात सीएसकेला मोठा झटका बसला. तो फक्त ७ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे या दोघांनी चांगली खेळी केली आणि डाव सावरला. आयुष म्हात्रे यानं आक्रमक खेळत अर्धशतक (73) ठोकलं. त्याच्या या अर्धशतकामुळे सीएसकेला त्यानं एका चांगल्या धावसंख्येवर नेवून ठेवलं. त्यानंतर शिवम दुबे, सर्फराज खान यांनीही चांगली खेळी केली. शेवटी सीएसकेच्या संघाला या सगळ्यांच्या जोरावर 209 धावांची मजल मारता आली.

सीएसके संघानं फलंदाजीची सुरूवात म्हणावी तशी केली नव्हती पण पंजाबनं सुरूवातीला सीएलकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. 210 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या प्रियांश आर्यानं फक्त 11 चेंडूंत 39 धावांची (3 चौकार, 4 षटकार) झंझावाती खेळी केली. त्यानं पहिल्या 5 षटकांतच 61 धावांची सलामी देऊन विजयाचा पाया रचला. त्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संयमी पण आक्रमक 50 धावा (29 चेंडू) करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. शेवटी शशांक सिंग (14) आणि मार्कस स्टॉइनिस (9) यांनी 8 चेंडू राखून विजय मिळवला.

चेन्नईनं पंजाबविरुद्ध शेवटचा विजय 5 मे 2024 रोजी धर्मशाला येथे मिळवला होता. तर चेन्नईच्या मैदानात (चेपॉक) पंजाबनं सलग 4 सामन्यांत विजय मिळवला आहे.

चेन्नईच्या हातातून सामना कुठे गेला?
चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत प्रचंड धावा दिल्या. मॅट हेन्रीने 4 षटकांत 54 धावा तर अंशुल कंबोजनं 43 धावा खर्च केल्या. मधल्या षटकांत नूर अहमदनं टाकलेला ‘नो-बॉल’ आणि त्यावर कूपर कोनोलीनं घेतलेला फायदा चेन्नईला महागात पडला. चेन्नईचा संघ काही ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना धावांचा बचाव करण्यात सुद्धा असमर्थ राहिला. तसेच सीएसकेच्या कोणत्याही गोलंजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही.

या विजयानंतर पंजाब किंग्स 4 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचा हा या हंगामातील सलग दुसरा पराभव आहे त्यामुळे सीएसके 10 व्या (शेवटच्या) स्थानावर फेकला गेला आहे.

पंजाब किंग्सचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 6 एप्रिल 2026 रोजी ईडन गार्डन्सवर होणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्स यांचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध 5 एप्रिल 2026 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.