सीएसकेला आणखी एक मोठा झटका; ‘हा’ खेळाडू बाहेर

CSK 2026: आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यापूर्वी पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला एकामागून एक मोठे धक्के बसले आहेत. 2026 च्या हंगामाची सुरुवात सीएसकेसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. कारण त्यांच्या आणखी एका खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागत आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या होणाऱ्या पहिल्याच सामन्याला मुकणार आहे. संघाचे मुख्य कोच स्टेफिंग फ्लेमिंग यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे जाहीर केलं आहे की, मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस खेळू शकणार नाही.

ब्रेविस का खेळणार नाही आणि किती सामने मुकणार?
गुवाहाटीमध्ये सरावादरम्यान ब्रेविसला ‘साइड स्ट्रेन’ झाला आहे. म्हणजेच बरगड्यांच्या स्नायूंची दुखापत झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. ब्रेविस किमान दोन ते तीन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. तसेच तो पंजाब किंग्सविरुद्धच्या (3 एप्रिल) दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

इतर कोणते खेळाडू संघाबाहेर आहेत?
ब्रेविसव्यतिरिक्त सीएसकेला इतरही अनेक दिग्गज खेळाडूंच्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे.

  1. सीएसकेचा माजी कर्णधार धोनीला ‘काफ स्ट्रेन’ (पायाची दुखापत) झाला असून तो सुरुवातीचे दोन आठवडे (सुमारे 6 सामने) खेळणार नाही.
  2. नेथन इलिस हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हॅमस्ट्रिंगच्या जुन्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे.
  3. स्पेंसर जॉन्सन हा इलिसचा बदली खेळाडू म्हणून आलेला; पण जॉन्सन स्वतः पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. तो संघात 21 ते 23 एप्रिल दरम्यान सामील होण्याची शक्यता आहे, म्हणजेच तो सुरुवातीचे अनेक सामने मुकणार आहे. अर्थातच सीएसकेला यंदाच्या हंगामात सुरूवातीलाच मोठे झटके बसले आहेत. आता सीएसके संघ आणि कर्णधार ऋतुराज या परिस्थितीला कसे हाताळणार हे पहावं लागणार आहे.

ब्रेविसच्या जागी कोणाला संधी?
ब्रेविसच्या अनुपस्थितीत सीएसकेकडं ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मॅट शॉर्ट किंवा इंग्लंडचा जेमी ओव्हरटन हे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, कार्तिक शर्मा किंवा प्रशांत वीर या तरुण खेळाडूंनाही पदार्पणाची संधी मिळू शकते.

सीएसकेची संभाव्य प्लेइंग 11– कर्णधार ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, मॅट हेन्री, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कंबोज

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.