FIDE Candidates Tournaments 2026: सायप्रसमधील पेगिया येथील ‘कॅप सेंट जॉर्जेस हॉटेल आणि रिसॉर्ट’ मध्ये FIDE कॅन्डिडेट्स आणि महिला कॅन्डिडेट्स स्पर्धा एकाच वेळी पार पडणार आहेत. या स्पर्धेतील विजेता खेळाडू थेट जागतिक चॅम्पियनशिपच्या लढतीसाठी पात्र ठरतो. ही स्पर्धा आगामी 28 मार्च ते 16 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे.
सहभागी खेळाडूंची यादी
या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत प्रत्येकी 8 दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत.
पुरुष विभाग (Open Category)
- हिकारू नाकामुरा (USA)- रेटिंगच्या जोरावर पात्र.
- फॅबियानो कारुआना (USA)- FIDE सर्किट 2024 चा विजेता.
- आर. प्रज्ञानंद (India)- FIDE सर्किट 2025 चा विजेता.
- अनिश गिरी (Netherlands)- ग्रँड स्विस 2025 चा विजेता.
- वेई यी (China)- विश्वचषक 2025 चा उपविजेता.
- जावोखिर सिंदारोव्ह (Uzbekistan)- विश्वचषक 2025 चा विजेता.
- आंद्रे एस्पिपेन्को (FIDE)- विश्वचषक 2025 मधील तिसरा क्रमांक.
- मथियास ब्लूबाउम (Germany)- ग्रँड स्विस 2025 मधील उपविजेता.
महिला विभाग (Women’s Category)
- दिव्या देशमुख (India)- महिला विश्वचषक 2025 ची विजेती.
- आर. वैशाली (India)- महिला ग्रँड स्विस 2025 ची विजेती.
- झू जिनेर (China)- ग्रँड प्रिक्स 2024-25 ची विजेती.
- तॅन झोंगी (China)- महिला विश्वचषक 2025 मधील तिसरा क्रमांक.
- अँना मुझीचूक (Ukraine)- (कोनेरू हम्पीनं सुरक्षिततेच्या कारणास्तव माघार घेतल्यानं तिच्या जागी निवड).
- अलेक्झांड्रा गोर्याचकिना (FIDE)- ग्रँड प्रिक्स 2024-25 मधील उपविजेती.
- कॅटरिना लॅग्नो (FIDE)- महिला ग्रँड स्विस 2025 मधील उपविजेती.
- बिबिसारा अस्सौबाएवा (Kazakhstan)- रेटिंगच्या जोरावर पात्र.
स्पर्धेचा फायदा काय?
पुरुष गटातील विजेता खेळाडू भारताच्या डी. गुकेशविरुद्ध, तर महिला गटातील विजेती चीनच्या जू वेनजुन विरुद्ध जागतिक विजेतेपदासाठी लढेल. तसेच या स्पर्धेमुळे खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीत (Rating) मोठी सुधारणा होते आणि विजेत्यांना भरघोस बक्षीस रक्कम मिळते.

