इंटर मियामीच्या नवीन स्टेडियमच्या एका स्टँडला मेस्सीचे नाव

Leo Messi: फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीच्या सन्मानार्थ इंटर मियामीनं (inter miami) एक मोठा निर्णय घेतला आहे. क्लबच्या नवीन घरच्या मैदानावर म्हणजेच ‘नू स्टेडियम’मधील पूर्व स्टँडला (East Stand) आता अधिकृतपणे ‘लिओ मेस्सी स्टँड’ (Leo Messi Stand) असं नाव दिलं जाईल. ही माहिती इंटर मियामीच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर त्यांनी सांगितली आहे.

मेस्सीचं नाव का दिलं जात आहे?
क्लबनं स्पष्ट केलं की, हा सन्मान फक्त मेस्सीच्या भूतकाळातील कामगिरीसाठी नाही, तर तो सध्या मैदानावर जो जादूई अनुभव देत आहे, त्यासाठी आहे. मेस्सीच्या आगमनानंतर इंटर मियामीनं फक्त ट्रॉफीच जिंकल्या नाहीत, तर अमेरिकन फुटबॉलची (MLS) जागतिक ओळखही बदलली आहे.

मेस्सी आणि इंटर मियामीची आकडेवारी
मेस्सीच्या नेतृत्वाखाली इंटर मियामीनं आतापर्यंत 3 प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत- 2023 लीग कप, 2024 एमएलएस सपोर्टर्स शील्ड आणि 2025 एमएलएस कप.

मेस्सीनं आतापर्यंत इंटर मियामीसाठी 94 सामन्यांत विक्रमी 82 गोल केले असून 53 असिस्ट दिले आहेत.

मेस्सीनं आपल्या कारकिर्दीत विक्रमी 8 वेळा बॅलोन डी’ओर (Ballon d’Or) हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब पटकावला आहे.

मियामी फ्रीडम पार्क कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या नू स्टेडियमची बैठक क्षमता 26,700 च्या आसपास आहे. या मैदानावर इंटर मियामी आपला पहिला अधिकृत सामना 4 एप्रिल 2026 रोजी ऑस्टिन एफसी (Austin FC) विरुद्ध खेळणार आहे. आणि याच दिवशीच्या( 4 एप्रिल) सामन्याच्या सुरुवातीला ‘लिओ मेस्सी स्टँड’चं अधिकृत उद्घाटन आणि अनावरण केले जाईल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.