लिओनेल मेस्सीच्या ‘त्या’ गोलमुळे जिंकला इंटर मियामी

Inter Miami (USA): ‘मेजर लीग सॉकर’ (MLS) 2026 च्या हंगामात लिओनेल मेस्सीच्या (lionel messi) उत्कृष्ट गोलनं इंटर मियामीला पुन्हा एकदा विजयाच्या पथावर आणलं आहे. शनिवारी, 18 एप्रिल 2026 रोजी डेन्व्हरमधील ‘एम्पॉवर फील्ड’ येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात इंटर मियामीनं कोलोरॅडो रॅपिड्सचा (Colorado Rapids) 3-2 असा पराभव केला. या विजयामुळे इंटर मियामीनं आपली अपराजित राहण्याची मालिका सात सामन्यांपर्यंत केली आहे.

सुमारे 75,824 प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मेस्सीनं आपल्या कौशल्यानं चाहत्यांना आकर्षित केलं आहे. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीनं पेनल्टीवर पहिला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत जर्मन बर्टेरामेनं गोल करून ही आघाडी 2-0 केली. पण दुसऱ्या सत्रात कोलोरॅडो रॅपिड्सनं संघानं पुनरागमन केलं. त्यांच्या संघातील राफेल नवारो (58 वे मिनिट) आणि डॅरेन यापी (62 वे मिनिट) यांच्या गोलमुळे सामना 2-2 असा बरोबरीत आणला. मात्र, 79 व्या मिनिटाला मेस्सीनं आपला दुसरा आणि निर्णायक गोल करून इंटर मियामीचा विजय निश्चित केला.

MLS स्पर्धा काय आहे?
‘मेजर लीग सॉकर’ (MLS) ही अमेरिका आणि कॅनडातील सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. 1996 मध्ये सुरू झालेली ही लीग सध्या जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या फुटबॉल स्पर्धांपैकी एक मानली जाते.

इंटर मियामीनं 2026 च्या हंगामात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. यातील 4 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला असून, 3 सामने बरोबरीत सुटले आहेत आणि फक्त एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सध्या 15 गुणांसह संघ ईस्टर्न कॉन्फरन्समध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

आणखी हेही वाचा
केकेआरसाठी दिलासादायक बातमी; श्रीलंकनं गोलंदाज खेळणार आजचा सामना?-
https://agcsport.tv/cricket/good-news-for-kkr-will-sri-lanka-bowlers-play-in-todays-match/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.