जपानकडून भारतावर एकतर्फी विजय

AFC U20 Women’s Asian Cup 2026: गुरुवारी (2 एप्रिल 2026 रोजी) पथम थानी (Pathum Thani) येथील थम्मसत स्टेडियम (Thammasat Stadium) येथे भारत आणि जपान यांच्यात सामना पार पडला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला गट सामना (Group Stage Match) होता. या सुरू असलेल्या AFC U20 महिला आशियाई चषक 2026 (AFC U20 Women’s Asian Cup 2026) स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात जपानकडून 6-0 अशा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 20 वर्षांनंतर या स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघानं पहिल्या सत्रात कडवी झुंज दिली, मात्र दुसऱ्या सत्रात जपाननं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं.

सामन्याची सुरुवात भारतानं चांगली केली होती. मात्र, 12 व्या मिनिटाला भारताच्या थोईबिसाना चानू तोइजम (Thoibisana Chanu Toijam) कडून झालेला ‘ओन गोल’ (Own Goal) भारताला महागात पडला. तरीही जपानला पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी घेता आली. पण दुसऱ्या हाफमध्ये जपाननं वेग वाढवला आणि भारतीय बचाव फळी खिळखिळी केली. जपानसाठी मिकी किमुरा (५४’), नोआ फुकुशिमा (५७’), नत्सुमी टागो (७५’), मियू मत्सुनागा (८१’) आणि युरा होंडा (८७’) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

जपानविरुद्धच्या या पराभवामुळे भारतीय संघ सध्या ग्रुप ‘सी’ (Group C) मध्ये चौथ्या (शेवटच्या) स्थानावर आहे. आता भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) असून, तो 5 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने (ऑस्ट्रेलिया आणि चायनीज तैपेई विरुद्ध) जिंकणं अनिवार्य झालं आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि तीन गटांमधील दोन सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.