सिटीने तब्बल 5 वर्षानंतर जिंकले विजेतेपद

Carabao Cup 2026: रविवारी (22 मार्च) झालेल्या कॅराबो कपच्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीनं पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत 2026 चा कॅराबाओ चषक आपल्या नावे केला आहे. आर्सनलला सिटीनं 2-0 अशा फरकानं हरवलं. आणि विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, 2021 पर्यंत सलग चार वेळा ( 2018, 2019, 2020 आणि 2021 ) हा चषक जिंकल्यानंतर, तब्बल 5 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मँचेस्टर सिटीनं पुन्हा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका
21 वर्षीय युवा खेळाडू निको ओ’रेली (Nico O’Reilly) या विजयाचा खरा मानकरी ठरला. त्यानं उत्तरार्धात अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल (60 व्या आणि 64 व्या मिनिटाला) नोंदवून आर्सनलच्या स्वप्नांचा चुराडा केला.

आर्सनलचा बदली गोलरक्षक केपा अरीझाबालागा (Kepa Arrizabalaga) याची एक गंभीर चूक आर्सनलला महाग पडली. रयान चेर्कीच्या क्रॉसवर चेंडू केपाच्या हातातून सुटला, ज्याचा फायदा घेत निकोनं पहिला गोल केला. मँचेस्टर सिटीकडून 2-0 नं पराभूत झाल्यामुळे, आर्सेनलची ट्रॉफीसाठीची सहा वर्षांची प्रतीक्षा अजून किमान काही काळ थांबाव लागणार आहे.

कॅराबाओ चषकाचा इतिहास
या स्पर्धेला अधिकृतपणे ‘लीग कप’ (EFL Cup) म्हणून ओळखलं जातं आणि याची सुरुवात 1960-61 या हंगामापासून झाली. ॲस्टन व्हिला हा या स्पर्धेचा पहिला विजेता संघ होता.

दरम्यान, लिव्हरपूल हा संघ सर्वात यशस्वी संघ आहे, ज्यानं आतापर्यंत 10 वेळा विजेतेपद जिंकलं आहे. तर दुसरा संघ आता मँचेस्टर सिटी ठरला आहे. यानं आतापर्यंत 9 वेळा वेळा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यामुळे मँचेस्टर सिटी हा फुटबॉल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेला एक संघ आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.