दोन वेळेची विश्वविजेती टीम होणार २०२७ च्या विश्वचषकातून बाहेर?

वनडे विश्वचषक २०२७: बांग्लादेश संघाने नुकतचं पाकिस्तान संघाला आपल्या घरच्या मैदानावर २-१ ने हरवलं आहे. आणि या मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बांग्लादेशच्या या विजयाने २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या पात्रता रेसमध्येही मोठा बदल झाला आहे. ढाकाच्या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये बांग्लादेशने २९० धावा केल्या होत्या. पण पाकिस्तान त्या करता आल्या नाही. बांग्लादेशने त्या धावा वाचवल्या आणि ११ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. बांग्लादेशच्या या विजयामुळे वनडे रॅंकिंगमध्ये मोठा बदल होणार आहे. सध्या बांग्लादेशचा संघ वनडे रॅंकिंगमध्ये १० व्या स्थानावर आहे. पण बांग्लादेशच्या या विजयी प्रदर्शनामुळे दोन वेळेची विश्वविजेत्या संघाला मोठा झटका बसला आहे.

बांग्लादेशच्या विजयाने वेस्टइंडिला संघाला मोठा झटका?

बांग्लादेशच्या चांगल्या प्रदर्शनामुळे वेस्टइंडिज संघाला २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या अपेक्षांना मोठा झटका बसला आहे. कारण बांग्लादेशच्या या विजयाने आता नवीन वनडे रॅंकिंग आल्यावर बांग्लादेश १० व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर जाईल. आणि वेस्टइंडिज ९ व्या स्थानावरून १० व्या वर जाईल. तसेच पाकिस्तान मालिका हरून सुद्धा त्याच स्थानावर अबादित राहिल, फक्त गुणांमध्ये थोडी कमी येईल.

२०२७ चा वनडे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाव्बे आणि नामीबिया येथे आयोजित होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये एकुण १४ संघ खेळणार आहे. त्यातल्या दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाव्बे या दोन्ही देशांनी पात्रता मिळवली आहे. तर बाकीच्या संघला अजूनही पात्रता मिळवायची आहे. त्यामुळेच वेस्टइंडिजसाठी अजूनही पात्रता मिळवण्यासाठी मोठा धोकाचं आहे.

वेस्टइंडिज संघाला पात्रतासाठी विजयाची गरज
वेस्टइंडिज संघाला हा मोठा झटका बसला आहे. कारण कोणताही सामना न खेळताही संघाच्या रॅंकिंगमध्ये घसरण होणार आहे. जर त्यांना पात्रता मिळवायची असेल तर येणाऱ्या मालिकामध्ये विजय मिळवावा लागेल. नाहीतर त्यांच्यासाठी वनडे पात्रतेला हाणीकारक ठरू शकतं. वेस्टइंडिज दोन वेळा विश्वविजेता (१९७५ आणि १९७९) राहिला आहे. गेल्या वनडे विश्वषकात(२०२३) सुद्धा त्यांना पात्रता सामना खेळवा लागला होता. आणि त्यांनी तिथे पराभवाचा सामना करावा लागला होता.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.