स्टार्क खेळणार राजस्थानविरूद्ध पहिला सामना ?

Mitchell Starc IPL 2026: यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं खेळण्याची परवानगी दिली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला स्टार्क आता राजस्थान रॉयल्सविरूद्ध होणाऱ्या 1 मे च्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचं हे पुनरागमन दिल्लीच्या संघाला मजबूत आणि जिंकण्याची आशा जागी करतील.

गेल्या अनेक सामन्यांपासून बाहेर असलेल्या स्टार्कची अखेर यंदाच्या आयपीएमध्ये एन्ट्री होणार आहे. आता सगळ्यांच्या नजरा 1 मे वर खिळल्या आहेत, जेव्हा स्टार्क राजस्थान रॉयल्सविरूद्ध आपला पहिला सामना खेळेल. तसेच दुखापतीमधून आलेल्या स्टार्कचं पुनरागमन दिल्लीसाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

कशामुळे होता स्टार्क बाहेर
स्टार्कला 11.75 कोटी रुपयांना संघात कायम ठेवण्यात आलं आहे पण मिचेल स्टार्कनं अद्याप या हंगामातील एकही सामना खेळला नाही. कारण कोपर आणि खांद्याच्या दुखापतींमुळे त्याला खेळता आलं नाही. पण आता तो त्या (कोपर आणि खांद्याच्या) दुखापतीमधून सावरला आहे आणि म्हणूनच तो 1 मे ला आरआरविरूद्ध खेळण्याची शक्यता सांगितली जात आहे.

मागिल हंगामात स्टार्कनं दिल्लीसाठी 11 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या होत्या. तर यावेळी संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. दिल्लीनं या हंगामात 6 सामन्यांपैकी 3 विजय आणि 3 पराभव मिळाले आहेत. आणि 6 गुणांसह 5व्या स्थानावर आहेत. जर अशातच मिचेल स्टार्क संघात आला तर संघाला आणखीनचं फायदा होईल. कारण त्याची आक्रमकता आणि वेगवान गोलंदाजीमुळे त्याला विकेट्स मिळायला मदत होते, त्यामुळे संघाला विजय मिळवून देण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा दिल्लीला आणि त्यांच्या चाहत्यांना आहे.

आणखी हेही वाचा
फिफाच्या विशेष विकास कार्यक्रमासाठी भारताची निवड-
https://agcsport.tv/football/india-among-12-countries-selected-for-fifa-special-development-programme/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.