ICC T20 WC: आयसीसी टी२० विश्वचषकात आज (४ मार्च) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना कोलकत्त्याच्या ईडन गार्डन या स्टेडियमवर खेळवणार आहे. हा या विश्वचषकाचा पहिला उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना आहे. हा बाद फेरीचा सामना असल्यामुळे ज्या संघाचा या सामन्यात पराभव होईल त्याचा या विश्वचककाचा प्रवास इथेच संपेल.
T20 मध्ये कोणाचं रेकॉर्ड कसं आहे
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आतार्यंतचं टी२० मध्ये रेकॉर्ड पाहिले तर दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं आहे. कारण आतापर्यंत यांच्यात टी२० मध्ये १९ सामने झाले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने १२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ७ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या आकड्यांवरून न्यूझीलंड विरूद्ध टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेची चांगली कामगिरी आहे.
ICC T20 World Cup मध्ये रेकॉर्ड कसं आहे
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आतापर्यंत आयसीसी टी२० विश्वचषकात ५ वेळा आमनेसामने आले आहेत. आणि या पाचही वेळेस दक्षिण आफ्रिका संघ विजेता राहिला आहे. २००७, २००९, २०१०, २०१४ आणि २०२६ अशा पाचही वेळेस न्यूझीलंड संघाचा दक्षिण आफ्रिकेने पराभव केला आहे. आता पुन्हा एकदा हे दोन्ही दिग्गज संघ एमेकांसमोर आले आहेत. आणि तेही उपांत्य फेरीच्या सामन्यात आले आहेत.
११ वर्षांचा बदला
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात ११ वर्षांपुर्वी आयसीसीचा उपांंत्य फेरीचा सामना झाला होता. हा आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना होता. २०१५ च्या साली न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याचं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न भंगल होतं. आता पुन्हा एकदा आयसीसीच्या टी२० विश्वचकाच्या निमित्ताने हे दोन्ही संघ तब्बल ११ वर्षानंतर आमनेसामने आले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ११ वर्षानंतर बदला पुर्ण कराण्याची संधी मिळला आहे.
आजची संभाव्य प्लेइंग ११
दक्षिण आफ्रिका संघ– कर्णधार ॲडम मारक्रम, क्विंटन डी कॉक, रायन रिकेलटन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एन्गीडी
न्यूझीलंड संघ– कर्णधार मिचेल सेंटनर, टीम सायफर्ट, फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलीप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, कोल मॅककोन्ची, मॅट हेन्री, इश सोडी, लोकी फर्गुसन

