केकेआरला प्लेऑफसाठी पोहोचण्याचे गणित कसे आहे?

KKR vs MI IPL 2026: काल (20 मे) झालेल्या कोलकत्ता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 65व्या चुरशीच्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) संघानं मुंबई इंडियन्सचा (MI) 4 गडी राखून पराभव केला. या अटीतटीच्या विजयामुळे कोलकत्तानं प्लेऑफ (Playoffs) शर्यतीतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे.

या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिली फलंदाजी करावी लागली. कोलकत्त्याच्या अचूक गोलंदाजीसमोर मुंबईची सुरुवात खराब झाली. अवघ्या काही धावांवर रोहित शर्मा (15) आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. पावसामुळे सामन्यात थोडा व्यत्यय आला. त्यानंतर हार्दिक पंड्या (26) आणि मधल्या फळीत आलेल्या कॉर्बिन बॉशच्या 18 चेंडूंतील वेगवान 32 धावांच्या जोरावर मुंबईनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 147 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य उभं केलं.

148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्याची सुरुवातही खराब झाली. फिन अ‍ॅलन (8) आणि अजिंक्य रहाणे (२१) स्वस्तात बाद झाले. त्यामुळे संघावर थोडा दबाव आला होता. पण अनुभवी मनिष पांडेनं डाव सावरला आणि सर्वाधिक 45 धावांची अत्यंत संयमी खेळी साकारली. त्याला रोवमन पॉवेलनं (40 धावा) उत्तम साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. अखेरच्या षटकांत अनुकुल रॉयनं चौकार खेचत 18.5 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा करून कोलकत्त्याला शानदार विजय मिळवून दिला.

मुंबईचा संघ हा सामना प्रामुख्यानं त्यांच्या कमकुवत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे हरला. पहिल्या डावात त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी संथ खेळ केला, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 148 धावांचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी मनिष पांडे आणि पॉवेलची जोडी तोडण्यास खूप उशीर केला, ज्यामुळे हातात असलेला सामना त्यांच्याकडून निसटला. तसेच क्षेत्ररक्षणातही मुंबईच्या खेळाडूंनी चुका केल्या ज्यामुळे मुंबई पुर्णपणे सामन्यातून बाहेर पडला.

या विजयामुळे मिळालेल्या 2 गुणांसह कोलकत्ता नाईट रायडर्सनं गुणतालिकेत आगेकूच केली असून त्यांच्या बाद फेरीच्या आशा कायम आहेत. आता प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी केकेआरला पुढचा सामना जिंकावाच लागेल आणि इतर संघावर अवलंबून रहावं लागणार आहे.

आणखी हेही वाचा
वैभवने केला वर्ल्ड रेकॉर्ड; अनेक खेळाडूंचे मोडले विक्रम-
https://agcsport.tv/cricket/vaibhav-sets-world-record-many-players-break-records/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.