भारताचा वेस्टइंडिज विरूद्ध ‘या’ कारणामुळे होणार पराभव!

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना वेस्टइंडिज विरूद्ध रविवारी होणार आहे. भारताने यंदाच्या टी२० कपमध्ये आतापर्यंतच्या फक्त सामना हरला आहे. साऊथ आफ्रिकेकडून ग्रुप स्टेजमध्ये भारताचा हा पराभव झाला होता. पण भारताने पुनरागमन करून झिम्बाब्वे विरूद्धचा सामना जिंकला. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताला आता काहीही करून पुढचा सामना जिंकावाच लागणार आहे. जर असं झालं नाही तर भारतीय संघ या टी२० विश्वचषकातून बाहेर पडेल.

भारताचा पुढचा सामना कुठे होणार आहे.
भारताचा उपांत्य फेरीचा सामना कोलकत्त्याच्या इडन गार्डनवर रविवारी (१ मार्च) होणार आहे. जिथे भारताचं आतापर्यंत वर्चस्व राहिलं आहे. हे इडन गार्डन भारतासाठी एका किल्ल्यासारखं रक्षण करून भारताला उपांत्य फेरीच दार उघडून देऊ शकतं. कारण भारताचं याचं ग्राऊंडवर वेस्टइंडिज विरुद्ध चांगल रेकॉर्ड आहे. म्हणजे एकाप्रकारे भारताने वेस्टइंडिजवर वर्चस्व गाजवलं आहे. आतापर्यंत भारताने वेस्टइंडिज विरूद्ध टी२०i मध्ये चार सामने खेळले आहेत. आणि हे चारही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे इडन गार्डनचं हे ग्राऊंड सध्या भारतासाठी कोणत्या वर्दानापेक्षा कमी नाहीये.

आता भारत हा सामना कसा गमावू शकतो?
वेस्टइंडिज संघालाही पुढचा सामना काहीही करून जिंकायचा आहे. कारण त्यांचा जर पराभव झाला तर त्यांचाही यावर्षीचा प्रवास त्याच सामन्यात संपेल. सध्या गुणतालिकेत भारतीय संघ आणि वेस्टइंडिज समान गुणांवर आहे. जर इडन गार्डनवर वेस्टइंडिजचा रेकॉर्ड पाहिला तर त्यांनी टी२० विश्वचकाच्या इतिहासात एकही सामना या मैदानावर गमावला नाही. त्यामुळे हा रेकॉर्ड भारतासाठी चांगलाच हाणीकारक ठरणार आहे असं दिसून येत आहे. वेस्टइंडिजने आतापर्यंच टी२० विश्वचशकाच्या इतिहासात ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.

वेस्टइंडिजने २०१६ साली याच इडन गार्डनवर अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि ट्रॉफी जिंकली होती. आणि हा त्यांचा त्या ग्राऊंडवर पहिला विजय होता. त्यानंतर इडन गार्डनवर टी२० विश्वचषकात यंदाच्या वर्षीच त्यांचे दोन सामने झाले. पहिला सामना स्कॉटलँड आणि दुसरा सामना इटली संघासोबत झाला. आणि या दोन्ही सामन्यात वेस्टइंडिजने विजय मिळवला आहे. असे त्यांनी टी२० विश्वचकाच्या इतिहासात ३ सामने खेळले आहे आणि तिन्ही जिंकले आहेत. आता त्यांचा पुढचा सामना याच मैदानावर भारतासोबत आहे.

भारताच्या पराभव आणखी एक कारण काय असू शकत?
आणखी एक कारणामुळे भारतीय संघाचा पराभव होऊ शकतो. तो म्हणजे धावांचा पाठलाग करतानी. कारण भारताला टी२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही विराट कोहली शिवाय १६० धावांच लक्ष गाठता आलं नाही. टी२० विश्वचषकात तीनदा भारताला १६० धावांपेक्षा जास्त टार्गेट मिळालं होतं. आणि हे टार्गेट विराट कोहली असतानाच भारतीय संघाला करता आलं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.