विराट ‘अस’ करणारा पहिला भारतीय फलंदाज

RCB vs KKR: काल (13 मे 2026) झालेल्या आयपीएल (IPL 2026) च्या 57 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 6 गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. हा रोमांचक सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला.

आरसीबीच्या संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कोलकत्ता नाईट रायडर्सनं पहिली फलंदाजी केली. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात केकेआरनं आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीच्या 71 धावा आणि रिंकू सिंगच्या झंझावाती नाबाद 49 धावांच्या जोरावर कोलकत्तानं निर्धारित 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा उभारल्या.

193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात दमदार झाली. विराट कोहलीनं संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. त्याला देवदत्त पडिक्कल (39) आणि कर्णधार रजत पाटीदार यांची चांगली साथ लाभली. आरसीबीनं हे कठीण लक्ष्य अवघ्या 19.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावा काढून पूर्ण केले आणि 6 गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली यानं सर्वाधिक खेळ केला. त्यानं अवघ्या 60 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 105 धावांची ऐतिहासिक शतकी खेळी केली. या मॅचविनिंग कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं. केकेआरकडून कार्तिक त्यागीनं 32 धावांत 3 बळी घेतले, पण ते अपुरे पडले.

कोलकत्ता कुठे हरली?
कोलकत्तानं हा सामना त्यांच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे गमावला. 192 धावांचा मोठा स्कोअर उभारूनही केकेआरचे गोलंदाज विराट कोहलीला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच मोक्याच्या क्षणी पडिक्कलला मिळालेले जीवदान केकेआरला महाग पडले, ज्यामुळे आरसीबीनं सहजपणे धावांचा पाठलाग केला.

कालच्या सामन्यात झालेले रेकॉर्ड्स
विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील आपलं 9 वे शतक केेलं आहे. तसेच चालू 2026 च्या हंगामातील हे त्याचं पहिलं शतक आहे.

विराट कोहली टी-20 क्रिकेट प्रकारात 14,000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

या विजयासह आरसीबीनं गुजरात टायटन्सला मागे टाकत आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान (No.1) गाठलं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.