IPL 2026: आयपीएल २०२६ च्या आधीच धोनीच्या ७ नंबर जर्सीचा नंबर बदलला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चालू झाली आहे. या व्हिडिओमध्ये धोनीची ७ नंबरची जर्सी काढून त्याच्या जागी दुसऱ्याच नंबरची जर्सी आणि धोनीच नाव देण्यात आलं आहे.
धोनीच्या जर्सीत खरंच बदल होणार आहे का?
धोनी आणि त्याची जर्सी नंबर ७ला गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये एक खास स्थान आहे. मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो नाहीतर आयपीएल असो. त्याचा हा नंबर कायम त्याची ओळख राहिला आहे. आता त्याच्या याच जर्सीवरून चर्चेला उधान आलं आहे. कारण एका व्हिडिओमध्ये धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीच्या जागी आता ८ नंबरची जर्सी लावली आहे. त्यामुळे चाहते चांहलेचं हैरान झाले आहेत.
धोनीची नंबर ७ जर्सी निवृत्त झाली?
भारतीय संघाचा पुर्व कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या सन्मानार्थी २०२३ मध्ये त्याची ७ नंबरची जर्सी निवृत्त करण्यात आली. भारतीय क्रिकेट बोर्डाने(BCCI) हा निर्णय घेतला होता. त्यामुळे धोनीच्या जर्सीचा नंबर कोणताही भारतीय खेळाडू घालू शकत नाही.
धोनी खरंच जर्सी बदलणार का?
‘काही संख्या कायम लक्षात राहत असतात. त्यातलीच एक ७ ही आहे पण आज मी ८ नंबर निवडणार आहे. तुम्हाला लवकरच कळेल का?’ असं त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे.
या व्हिडिओमध्ये धोनीच नावं वापरलं गेलं आहे. आणि धोनीचा ७ नंबरचा आकडा काढून त्याच्या जागी ८ नंबरचा आकडा टाकला आहे. बाकी त्यात कुठेही जर्सीत बदल दिसला नाही. विशेष म्हणजे जो सीएसकेचा पिवळा रंग आहे. तो या जर्सीत कुठेही पिवळ्या रंगाचा वापर केला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त ब्रॅंड प्रसारणसाठी केलेला आहे असं अनेकांच मत आहे.
धोनी का घालतो ७ नंबरची जर्सी आणि काय महत्त्व आहे त्याच्या जर्सीचं?
एमएस धोनी याचा जन्मदिवस याच ७ तारखेला येतो म्हणून त्याने हा नंबर निवडला आहे. तसेच त्याने याच जर्सीमध्ये २००७ टी२० विश्वचषक, २०१३ चॅम्पियन ट्रॉफी आणि २०११ चा वनडे विश्वचषक जिंकला आहे. याच जर्सीमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी ५ आयपीएल किताबही जिंकले आहेत. त्यामुळे तो जर हा नंबर बदलत असेल तर अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असेल.
हा ८ नंबरच का निवडला असेल?
धोनीचा ७ नंबर काढून ८ नंबरचा व्हिडिओ टाकला कारण, रवींद्र जडेजा हा यंदाच्या वर्षी राजस्थान रॉयल्स कडून खेळणार आहे. गेली अनेक वर्ष तो सीएसके संघाकडून खेळत होता पण यावर्षी तो दुसऱ्या संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या सन्मानार्थी हा नंबर लावला असावा असं अनेक चांहत्याचं म्हणण आहे.

